आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्यस्थांचा मार्ग:मध्यस्थांचा मार्ग अवलंबा, आनंदी राहा

जामनेर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवादिकांपासून तर आजपर्यंत वाद सुरू आहेत. मात्र आपल्या घरात महाभारत घडू द्यायचे नसेल तर मध्यस्थांचा मार्ग अवलंबावा, असे मत न्या.डी.एन.चामले यांनी जामनेर न्यायालयात आयोजित ‘मध्यस्थी’ या कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करतांना व्यक्त केले.

महाभारतात श्रीकृष्णाने मध्यस्थाची भूमिका घेतली होती, मात्र वाद मिटला नव्हता. म्हणून महाभारत घडले. त्यामुळे आधीपासूनच मध्यस्थांची भूमिका महत्वाची राहिली आहे. मध्यस्थांमार्फत दोघांच्या सामंजस्याने मार्ग काढला जात असल्याने कुणाचाही जय किंवा पराजय होत नाही. नात्यातील गोडवा रहातो. विधी सेवा प्राधिकरण हे गरीब श्रीमंत असा भेदभाव करीत नसून सर्वांना न्याय देण्याचाच प्रयत्न केला जातो. मात्र त्यात वेळ व पैसा दोघोही खर्च होत असल्याने मध्यस्थाचा मार्ग अवलंबावा असेही मत न्या.चामले यांनी व्यक्त केले.

जीवनात संकटांना तोंड देणाराच व्यक्ती यशस्वी होतो. शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता आव्हानांना तोंड देण्याचे आवाहन केले. यावेळी मध्यस्थी केंद्रात तडजोड केलेल्या प्रकरणात अपील करता येत नसल्याची माहिती सह दिवाणी न्या. बी.एन.काळे यांनी दिली.

नादाला लागू नका तुम्ही आमच्याकडे आलात की आम्ही आधी फी विचारतो. आणली असेल तर कोर्टात उभे राहतो, नाहीतर टाळाटाळ करतो. त्याउपरही कुणीतरी एक पक्षकार केस जिंकतो आणि दुसरा हरतो. मात्र दोघांनाही फी द्यावीच लागते. त्यामुळे वाद करून आमच्या नादाला लागू नका. अॅड.एस.आर.पाटील यांनी असे सांगताच न्यायधीश, वकीलांसह उपस्थितांमध्ये हशा पिकला. सहन्यायाधीश पी.व्ही.सूर्यवंशी, सरकारी वकील कृतीका भट, अनिल सारस्वत, विधीज्ञ आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...