आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिक तपास:खुनाच्या तपासासाठी 4 स्थानकांचे घेतले फुटेज ; सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज घेतले ताब्यात

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड-अमृतसर एक्स्प्रेसमधील प्रवासी मनमीतसिंग गुरूपितसिंग (वय १९, रा.अमृतसर) याची सोबतच्या सहप्रवासी मित्रांनी हत्या करून मृतदेह गाडीतून बाहेर फेकला. याबाबत भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी पोलिस निरीक्षक विजय घेरडे यांनी खांडवा, भुसावळ, नांदेड, अकाेला रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज ताब्यात घेतले.

भुसावळातील खांडवा मार्गावरील कॉर्ड लाइन भागात एका युवकाचा मृतदेह २७ ऑक्टाेबरला सकाळी पडला होता. शवविच्छेदनात या युवकाचा मृत्यू रेल्वेतून पडल्याने नव्हे तर त्याची हत्या झाल्याचा संशय पुढे आला. हा मृतदेह मनमीतसिंग गुरूपितसिंग (वय १९) याचा होता. मृत मनमीतसिंगच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून अमृतसर येथील चार जणांविरुद्ध २९ ऑक्टोबरला खुनाचा गुन्हा दाखल झाला. पोलिस निरीक्षक विजय घेरडे तपास करत आहे. सीसीटीव्ही फुटेजमधून जास्तीची माहिती शोधण्याचा प्रयत्न आहे.

बातम्या आणखी आहेत...