आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात मार्चच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत आंब्यांचे दर प्रतिकिलो २८० ते ३०० रुपयांपर्यंत जातात. यंदा मात्र हंगामाच्या सुरुवातीलाच केरळ, तामिळनाडू व आंध्र प्रदेशातून आवक वाढल्याने आंबा १४० ते १६० रुपये किलोने विक्री होत आहे. त्यात अजून घसरण होण्याची शक्यता आहे. शहराच्या बाजारात जानेवारीपासून आंब्याची आवक सुरू होते. मार्चमध्ये हे प्रमाण वाढते.
दरम्यान, गेल्या चार वर्षांपासून मार्च महिन्यात गुलाबकश, बदाम या जातीच्या आंब्यांचे दर प्रतिकिलो २८० ते ३०० रुपये किलोपर्यंत असतात. एप्रिलनंतर त्यात घसरण होते. यंदा मात्र पहिल्यांदाच मार्चमध्ये आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडूतून गुलाबखश, बदाम या आंब्यांची आवक वाढल्याने दर केवळ १४० ते १६० रुपये किलोपर्यंत आहेत. मात्र, हापूस आंब्यांचे प्रती डझन १ हजार ते १२०० रुपये दर आहेत. भुसावळात येणारा आंबा नवी मुंबईतील वाशी मार्केटमधून आणला जातो. काही व्यापारी तो विभागात इतरत्र घाऊक बाजारात विकतात.
मार्च महिन्यातही ग्राहकांकडून आंब्यांची खरेदी वाढली आहे. ही स्थिती कायम राहिल्यास दर पुन्हा घसरतीलजास्त उत्पादनामुळे आवक वाढून सुरुवातीलाच दर निम्म्यावर आले आहेत. सध्याचे वातावरण कायम राहिले, नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाले नाही तर आगामी काळात आंब्यांचे दर खूपच घसरतील. - रईस बागवान, फळांचे व्यापारी, भुसावळ
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.