आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट कागदपत्रे:वारस कमी करण्यासाठी दिली बनावट कागदपत्रे

भुसावळ23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये वारसा हक्क नाव कमी करण्यासाठी तलाठी कार्यालयात बहिणीच्या खोट्या स्वाक्षऱ्या, खोटे दस्तऐवज दिल्याप्रकरणी रूपाली दर्शन सोनार यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात शांती नगरातील रहिवासी भाऊ मयूर चव्हाण याचे विरुद्ध गुन्हा दाखल झाला.

रूपाली दर्शन सोनार (वय ३०, रा. म्हाळसाई गणेश कॉलनी, पाचोरा) यांचे माहेर भुसावळ येथील शांती नगरातील आहे. वडिल अशोक बाबूराव चव्हाण यांचे मौजे सतारा, निंभोरा, खडका, यावल येथे प्लॉट आहेत. तसेच आईच्या नावावरही प्लॉट आहे. यांचा व्यवहार किंवा विकासकामे करण्यासाठी वेळोवेळी भुसावळला येणे शक्य नसल्याने भाऊ मयूर अशोक चव्हाण याने वडिल हयात असताना बहिणींकडून जनरल मुख्त्यारपत्र करून घेतले.

वडिलांच्या मृत्यूनंतर मयूरने सामूहिक वारसा हक्काच्या मिळकतीचे हक्कसोड पत्रावर स्वाक्षऱ्या घेतल्याचे लक्षात आले. तसेच या मुखत्यार पत्राचा गैरवापर होऊ नये म्हणून दिवाणी न्यायालयात बहिणींनी खटला देखील दाखल केला आहे. मात्र, भाऊ मयूरने वारसा हक्कातील नावे कमी करण्यासाठी कंडारी शिवारातील तलाठ्यांना अर्ज दिला. वारस हक्काची नावे कमी करण्यासाठी दिली जाणारी नोटीस मिळू नये यासाठी खोट्या व बनावट स्वाक्षऱ्या असलेले दस्तावेज तलाठ्याकडे जमा केले. त्यामुळे रूपाली सोनार हिने भाऊ मयूर चव्हाण यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला.

बातम्या आणखी आहेत...