आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:फिर्यादीत व्यक्त केला फैजपूरचे माजी नगराध्यक्ष राणे यांच्यावर संशय; कारवर डंपर घालून ‘सर्कल’ला ठार मारण्याचा प्रयत्न, यावलमध्ये गुन्हा

यावल14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फैजपूरचे मंडलाधिकारी हे आपल्या मुलासह चारचाकी वाहनाने सावखेडा सिम (ता.यावल) या गावी जात होते. दरम्यान त्यांच्या वाहनाला विरावलीजवळ एका डंपरने समोरून धडक देत ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी रात्री घडली. या प्रकरणी मंडळाधिकाऱ्यांनी यावल पोलिसांत गुन्हा दाखल केला. त्यात फैजपूरचे माजी नगराध्यक्ष नीलेश राणेवर यांनी हा हल्ला घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला.

मंडळाधिकारी एम.एच.तडवी (वय ५३) यांनी यावल पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार बुधवारी ते मुलगा बिलाल तडवी याच्यासह फैजपूर येथून काम आटोपून सावखेडासीम येथे कारने (क्रमांक एमएच.१९-सीझेड.६४२३) जात होते. रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास विरावली गावापुढे कब्रस्तान-च्या अलीकडे दहिगाव कडून एक डंपर भरधाव वेगाने आले. त्याने मंडळाधिकाऱ्यांच्या कारला जबर धडक दिली. यावेळी बचावासाठी तडवी यांनी कार रस्त्याच्या कडेला उतरवली. या घटनेनंतर डंपर चालक सुसाट वेगाने पसार झाला. या दुर्घटनेत तडवी यांच्या वाहनाचे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले.

वरील फिर्यादीनुसार यावल पोलिस ठाण्यात जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला. फिर्यादीत मंडलाधिकारी तडवी यांनी आपणास ठार मारण्याच्या उद्देशाने फैजपूरचे माजी नगराध्यक्ष नीलेश राणे यांनी हा हल्ला घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला आहे. तपास पोलिस निरीक्षक तथा आयपीएस अधिकारी आशित कांबळे स्वत: करत आहे.

बातम्या आणखी आहेत...