आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जल्लोष:माजी मंत्री खडसेंच्या उमेदवारीचा जल्लोष ; विधीमंडळात गल्याने विकास कामांना गती मिळेल

भुसावळ21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्याने भुसावळ विभागातील यावल, मुक्ताईनगर, बोदवड, वरणगाव येथे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला. भाजपवर रोष व्यक्त करताना खडसे विधीमंडळात असल्यास जिल्ह्याच्या रखडलेल्या विकास कामांना गती मिळेल, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

यावल । शहरातील भुसावळ टि-पॉइंटवर राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी आतषबाजी करत जल्लोष केला. पक्षाचे जिल्हा प्रवक्ता अतुल पाटील, तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले, माजी नगरसेवक राकेश कोलते, शेख असलम, समीर मोमीन, गणेश महाजन, धीरज महाजन, डॉ. युवराज चौधरी, हाजी फारूख शेख, सुकदेव बोदडे, एजाज देशमुख, मोहसिन खान, फईम खान, हाजी नईम खान, फारूख मुन्सी, कामराज घारू, हाजी कलीम शेख, नीलेश बेलदार, निवृत्ती धांडे, शेख अलताफ, प्रभाकर बारी, अरशद मोमीन, जावेद पटेल, आबीद मेमन, आरीफ खान, विजय साळी, अरूण लोखंडे, महेंद्र भोई, राजेश जोगी, जुगल घारू उपस्थित होते.

बोदवड, नाडगावातही जल्लोष बोदवड | राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शहरात जल्लोष केला. तत्पूर्वी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. नंतर फटाके फोडून आतषबाजी करण्यात आली. तालुक्यातील नाडगाव येथे देखील कार्यकर्त्यांनी निर्णयाचे स्वागत केले. यावेळी माजी संरपच कैलास माळी, कडू माळी, कल्पेश शर्मा, विनोद पालवे, सागर जैस्वाल, दीपक वाणी, किरण वंजारी, आंनदा पाटील, रवि खेवलकर उपस्थित होते.

वरणगावात केली आतषबाजी वरणगाव | जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, युवक जिल्हा उपाध्यक्ष योगेश पाटील, माजी नगराध्यक्षा अरुणा इंगळे, प्रतिभा तावडे, रंजना पाटील, मनोज कोलते, पप्पू जकातदार, सुधाकर जावळे, साजिद कुरेशी, गणेश चौधरी, विष्णू खोले, रोहिणी जावळे, पिंटू धोबी, प्रतिभा चौधरी, प्रकाश नारखेडे, अनिल चौधरी, राजेश इंगळे, इफ्तेखार मिर्जा, महेश सोनवणे, नरेंद्र इंगळे आदी उपस्थित होते.

वरणगावात डीजेचा दणदणाट मुक्ताईनगर | माजी मंत्री एकनाथ खडसे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्याच्या निर्णयाचे मुक्ताईनगरातील राष्ट्रवादीचे पदाधिकरी, खडसे समर्थकांनी स्वागत केले. शहरातील पक्ष कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी करून डिजेच्या तालावर कार्यकर्ते थिरकले. यावेळी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन राजेंद्र माळी, विलास धायडे, किशोर चौधरी ,आसिफ बागवान यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते व खडसे समर्थक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...