आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागोळीबार, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, मारहाण, दंगल, शस्त्र बाळगणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, पळवून नेणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेले गौरव सुनील बढे, जितू शरद भालेराव, सचिन अरविंद भालेराव आणि भावेश कांतिलाल दंडगव्हाळ या चौघांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश तात्कालिन पोलिस अधीक्षक डाॅ. प्रवीण मुंढे यांनी २८ सप्टेंबरला काढले होते. त्याची ११ नोव्हेंबरला अंमलबजावणी करण्यात आली.
गाैरव बढे याने चार जणांची टोळी तयार केली हाेती. या टोळीच्या माध्यमातून तो शहरात दहशत निर्माण करत होता. त्यांच्याविरुद्ध विविध गुन्हे दाखल आहेत. यामुळे पोलिसांनी गौरव सुनील बढे, जितू शरद भालेराव, सचिन अरविंद भालेराव आणि भावेश कांतिलाल दंडगव्हाळ यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून पोलिस अधीक्षकांना पाठवला हाेता. त्याची चौकशी होऊन चौघांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. यानंतर त्यांच्यावर दाखल गुन्ह्यांचा आढावा घेऊन तात्कालिन पोलिस अधीक्षक डाॅ.मुंढे यांनी हद्दपारीचे आदेश काढले होते.
कृष्णा खरारे एक वर्षासाठी हद्दपार
सार्वजनिक शांततेला बाधा आणत असल्याने कृष्णा खरारे याला देखील एक वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. प्रांताधिकाऱ्यांनी हा आदेश काढला. शहर पोलिस ठाण्याने उपद्रवी, कायदा-सुव्यवस्थेला बाधा ठरणाऱ्यांच्या हद्दपारीचे प्रस्ताव प्रांतांकडे सादर केले आहेत. त्यानुसार शुक्रवारी कृष्णाच्या हद्दपारीचे आदेश निघाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.