आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:परसाडे येथे चौघांना मारहाण; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

यावल10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील परसाडे येथे घरकुल गैरव्यवहाराबाबत नागरिकांनी केलेल्या तक्रारींबाबत शहानिशा व माहिती घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना गावातील सहा जणांनी लाठ्याकाठ्या घेऊन मारहाण केली. त्यात चार जण जखमी झाले असून या प्रकरणी पोलिसांत सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

एका वृत्तवाहिनीचे पत्रकार आशोराज तायडे, रा. डोंबिवली यांनी यावल पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार ते व त्यांचे सहकारी अमित सिराज तडवी, ओम शंकर रायकवार हे परसाडे येथे तेथील घरकुलांबाबत माहिती घेण्यासाठी गेले. गावातील घरकुलामध्ये होणाऱ्या गैरव्यवहाराची माहिती तेथील नागरिकांनी सांगितली. त्यानंतर हे सर्वजण गावालगत असलेल्या पांढरी वस्तीत गेले. तेथे इब्राहिम केशरा तडवी यांची मुलाखत घेत असताना मजीत अरमान तडवी, अजित अरमान तडवी, राजू अरमान तडवी, अरमान सुपडू तडवी, रहमत रहेमान तडवी व नजमा मजीत तडवी हे सहा जण हातात बांबू व काठ्या घेऊन आले. त्यांनी आशाेराज तायडे व त्याचे साथीदार तसेच इब्राहिम तडवी या सर्वांना मारहाण केली. वाद सोडवण्यास आलेल्या

यासीन सुभान तडवी यांनाही मारहाण केली. त्यांचा कॅमेरा फोडून त्यातील मेमरी कार्ड काढून घेण्यात आले. या हाणामारीत तायडे यांच्या गळ्यातील चेन गहाळ झाली. फिर्यादीनुसार येथील पोलिसांत सर्व सहा जणांविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पाेलिस या गुन्ह्याचा कसून तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...