आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा१९००५ आणि १९००६ क्रमांकाच्या सुरत-भुसावळ-सुरत एक्स्प्रेसचे चार डबे १११२७ व १११२८ भुसावळ-कटनी एक्स्प्रेसला जोडले जाणार आहेत. यामुळे सुरतपासून थेट कटनीपर्यंत किंवा कटनीपासून सुरतपर्यंत डबा न बदलता प्रवास करता येईल. या निर्णयामुळे भुसावळातून धावणारी कटनी एक्स्प्रेस आता ८ ऐवजी १२ डब्यांची होईल.
गेल्या अडीच वर्षापासून बंद असलेली सायंकाळी भुसावळ-सूरत पॅसेंजर १५ जूनपासून सुरू होणार आहे. मात्र, पॅसेंजर ऐवजी या गाडीला एक्स्प्रेसचा दर्जा देण्यात आला आहे. या गाडीला २ एसी थ्री टियर, ८ स्लीपर, ७ द्वितीय श्रेणी बोगी (दोन गार्ड ब्रेक वॅनसह) असतील. दरम्यान, ही गाडी भुसावळ-कटनी (क्रमांक १११२७ व १११२८) एक्स्प्रेसला कनेक्टेड असेल. सुरत एक्स्प्रेसचे चार डबे भुसावळात कटनी एक्स्प्रेसला जोडले जातील. भुसावळातून कटनीपर्यंत धावणारी ही गाडी यापूर्वी आठ डब्यांची होती. सुरत एक्स्प्रेसचे चार डबे कनेक्ट राहणार असल्याने भुसावळ-कटनी आता १२ डबे घेऊन धावोल. या सुविधेमुळे सुरत येथून कटनीपर्यंत व कटनी येथून सुरतला आरक्षित व अनारक्षित डब्यांतून प्रवास करणाऱ्यांची सोय होईल.
असे आहे गाडीचे वेळापत्रक
सुरत-भुसावळ एक्स्प्रेस रात्री ११.१० वाजता सुरत स्थानकातून सुटेल. ती दुसऱ्या दिवशी सकाळी ७.५५ वाजता भुसावळात पोहोचेल. तर गाडी क्रमांक १९००६ भुसावळ-सुरत एक्स्प्रेस सायंकाळी ७.३० वाजता भुसावळ रेल्वे स्थानकातून सुटेल. ती दुसऱ्या दिवशी पहाटे ५.१५ वाजता सूरतला पोहोचेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.