आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्रोत्सवाचा ‎जल्लोष:चार दशके उटखेडा येथे‎ एक गाव एकच देवी‎; सर्व ग्रामस्थ एकत्रितपणे साजरा करतात उत्सव‎

उटखेडा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संपूर्ण देशभरात नवरात्रोत्सवाचा ‎जल्लोष आहे. उटखेडा येथेही चार ‎ ‎दशकांपासून एक गाव एक देवी हा उपक्रम राबवला जात आहे.‎ नवरात्रात नऊ दिवस दुर्गा‎ पूजनाला महत्व देण्यात आले आहे. ‎तसेच नवरात्रीत गरबा दांडिया‎ आणि सांस्कृतिक कार्यक्रम‎ आयोजित केले जातात. नवरात्री निमित्ताने गरब्याचा कार्यक्रम मोठ्या ‎उत्साहात आयोजित केला जातो.‎ गरबा नृत्याचे वर्णन शास्त्रात ‎अध्यात्मिक साधनेचा मार्ग म्हणून‎ केले आहे.

उटखेडा येथील एक‎ गाव एक देवी उपक्रमाला यंदा ४०‎ वर्षे पूर्ण होत आहेत. या उत्सवाला‎ १९८२मध्ये सुरुवात झाली. नवयुवक‎ मित्र मंडळाचे कार्यकर्ते यशवंत‎ महाजन, रवींद्र पाटील, गोपाळ‎ महाजन, अनिल महाजन, प्रभू‎ पाटील यांच्या प्रेरणेतून हा उत्सव‎ सुरु झाला होता. सन २०००पासून‎ ‎अध्यक्ष जिजाबराव महाजन हे काम‎ पाहत आहेत.

नवरात्र उत्सव मोठ्या‎ आनंदाने व भक्तिभावाने साजरा‎ केला जातो. भक्तीभावाने ग्रामस्थ‎ देवीची पूजाअर्चना करतात. त्यामुळे‎ गावात नवचैतन्याचे वातावरण‎ निर्माण झाले आहे. नवयुवक दुर्गा‎ मंडळ निर्विघ्नपने दुर्गा उत्सव‎ साजरा करत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...