आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांना मारहाण करत दोन आरोपींना पळवले:जुगार अड्ड्यावर छापा टाकल्यानंतर सरपंचासह चौघांची पोलिसांना मारहाण

भुसावळ22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ तालुका पोलिसांनी कुऱ्हे पानाचे येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकत १६ जणांना ताब्यात घेतले. मात्र, गावाच्या सरपंचासह अन्य चौघांनी थेट पोलिसांना मारहाण करत दोन आरोपींना त्यांच्या ताब्यातून पळवून लावले. पोलिसांना उद्देशून ‘तुमची औकात दाखवून देऊ. तुम्ही आमचे काहीही वाकडे करू शकत नाही,’ अशी धमकी दिली. याप्रकरणी सरपंच जीवन प्रल्हाद पाटीलसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली.

डीवायएसपी साेमनाथ वाघचौरे यांना कुऱ्हे पानाचे येथे जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर विशेष पथकाने मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास छापा टाकून १६ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यात गोपाळ बारी व महेश वराडे यांचा समावेश होता. या दोघांना घेऊन जात असताना सरपंच जीवन प्रल्हाद पाटील, प्रमाेद रामा भाेई, ईश्वर भागवत भाेई व सुभाष भिका पाटील यांनी पोलिसांना मारहाण करून कारवाईला विरोध केला. बाजारपेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी रमण सुरळकर यांच्या मनगट, नाकाला दुखापत करून त्यांच्या ताब्यातील बारी व वराडे यांना बळजबरीने साेडवून पळ काढला. याप्रकरणी पोलिस कर्मचारी रमण सुरळकर यांच्या फिर्यादीवरून सरपंच जीवन पाटीलसह वरील तिन्ही जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला.

जिल्हा प्रशासनाकडे सरपंचाविरुद्ध अपात्रतेचा प्रस्ताव देणा
कुऱ्हे पानाचे येथील सरपंच जीवन पाटील याने पथक जुगाऱ्यांवर कारवाई करत असताना पोलिसांना धक्काबुक्की केली. दोन जुगाऱ्यांना पोलिसांच्या ताब्यातून पळवून लावले. त्याला अपात्र करावे यासाठी पोलिस प्रशासनामार्फत जिल्हा प्रशासनाकडे रीतसर प्रस्ताव सादर करणार आहोत. - सोमनाथ वाघचौरे, डीवायएसपी, भुसावळ

बातम्या आणखी आहेत...