आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णालयात उपचार सुरू:यावल-सातोद रस्त्यावर दुचाकींची धडक, चार जखमी

यावलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातून सातोदकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये चार जण जखमी झाले. त्यांच्यावर यावल ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पैकी एकाच्या डोक्याला जबर दुखापत झाली आहे. यावल-सातोद रस्त्यावर महसूल विभागाच्या पुरवठा गोदामाच्या पुढे दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये पारस धांडे (वय १७, रा.सातोद), मेहुल पाटील (वय १७, रा.सातोद), समाधान बापू कोळी (वय ३३, रा.कोळवद), बळीराम श्रावण कोळी (वय ८०, रा.कोळवद) हे चार जण जखमी झाले. अपघातानंतर चौघांना यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तेथे डॉ. सचिन देशमुख, अधिपरिचारिका आरती कोल्हे, पिंटू बागुल आदींनी जखमींवर उपचार केले. या जखमींमध्ये बळीराम कोळी या वृद्धाच्या डोक्याला जबर दुखापत झाली. त्यांची प्रकृती गंभीर आहे. सर्वांवर यावलमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

बातम्या आणखी आहेत...