आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरण संवर्धनाचा संदेश:मंदिराच्या आवारात लावलेल्या 144 झाडांचा चौथा वाढदिवस, फुग्यांनी सजवले, केक कापला

भुसावळ6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राधाकृष्ण प्रभातफेरीच्या सदस्यांनी शहरातील गायत्री मंदिर परिसरात तीन वर्षांपूर्वी १५० झाडे लावली होती. या रोपांची उंची आता चांगलीच वाढली आहे. त्यांचा चौथा वाढदिवस राधाकृष्ण प्रभात फेरीच्या सदस्यांनी शुक्रवारी साजरा केला. त्यासाठी झाडांना सजवण्यात आले. त्यांचे पूजन करून सायंकाळी आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते केकही कापण्यात आला.

राधाकृष्ण प्रभात फेरीने गायत्री मंदिरासमोरील मोकळ्या जागेत लावलेल्या १५० झाडांचे नियमित संगोपन केले. यापैकी १४४ वृक्ष जगले. शुक्रवारी या उपक्रमाचा चौथा वर्धापन दिन झाडांचा वाढदिवस म्हणून जल्लोषात साजरा करण्यात आला.राधेशाम लाहोटी यांच्यासह आमदार संजय सावकारे, माजी नगरसेवक निर्मल काेठारी, अॅड. बाेधराज चाैधरी, प्रा.दिनेश राठी, राेटरीचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर झुनझुनवाला व प्रभातफेरी सदस्यांच्या उपस्थितीत झाडांना फुलांचे हार, रंगीबेरंगी फुग्यांनी सजवून त्यांचे पूजन करण्यात अाले. हा अनोखा वाढदिवस पाहण्यासाठी परिसरातील नागरिक व वृक्षप्रेमींनी गर्दी केली हाेती.

आमदारांकडून कौतुक...वृक्षांच्या वाढदिवस साजरा करताना आमदार सावकारे, ब्रिजमाेहन अग्रवाल, एम.बी.अग्रवाल यांनी पाच किलो वजनाचा झाडाच्या आकाराचा केक कापला. राधाकृष्ण प्रभातफेरीने झाडे लावली, संगोपन केले आणि त्यांचा वाढदिवसही साजरा केल्याबद्दल आमदारांनी गौरवोद््गार काढले.

बातम्या आणखी आहेत...