आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंपूर्ण जळगाव जिल्हा मोतिबिंदूमुक्त करायचा आहे. त्यासाठी सर्वेक्षण करण्यासाठी जिल्हाभरात लवकरच सामूहिक अभियान राबवण्यात येणार आहे, ८०० रुग्णांची मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे, अशी घोषणा ज्येष्ठ नेत्ररोग तज्ञ, पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांनी केली. भाजपतर्फे जामनेरात मोफत मोतिबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात दाखल रुग्णांना मार्गदर्शन करताना ते बुधवारी बोलत होते. व्यासपीठावर नगराध्यक्षा साधना महाजन, उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर, डॉ.रागिणी पारेख, तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, शहराध्यक्ष आतीष झाल्टे, गटनेते डॉ.प्रशांत भोंडे, जे.के.चव्हाण,प्रा.शरद पाटील, अनीस केलेवाले, नाजीम शेख, विलास पाटील, अरविंद देशमुख, बाबुराव हिवराळे, उल्हास पाटील उपस्थित होते. मोफत नवीन प्रकारच्या विना टाक्यांची शस्त्रक्रिय करून, महागडी लेन्स बसवली जाणार आहे. जिल्हा मोतिबिंदू मुक्त करण्यासाठी अभियानाची घोषणा केली.
कार्यक्रमात बोलताना पद्मश्री डॉ.तात्याराव लहान, सोबत अन्य मान्यवर. यांचे लाभतेय सहकार्य मोफत मोतिबिंदू तपासणी शिबिरासाठी मुंबईहून डॉ.शेळके व किरण पाटील यांची टीम आली आहे. तसेच जामनेर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.आर.के.पाटील, विनय सोनवणे,टीएमओ डॉ.राजेश सोनवणे, अधिष्ठाता डॉ.गिरीश ठाकूर, परिचारिका, आशा वर्कर आदींचे सहकार्य लाभत आहे.

Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.