आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभुसावळ शहरात होळीसह धुलिवंदनाचा उत्साह दिसला. टिळा होळीचा आनंद घेताना रासायनिक रंगांचा वापर टाळण्यात आला. काही ठिकाणी रंगांऐवजी फुलांच्या पाकळ्यांची उधळण करण्यात आली. पोलिस अधिकाऱ्यांनी देखील आपल्या कर्मचाऱ्यांसह धूलिवंदन साजरे केले. शहरात श्री राधाकृष्ण प्रभात फेरीने पाण्याचा वापर टाळला. तसेच नैसर्गिक रंगांचा वापर करून पर्यावरण पूरक व प्रदूषणमुक्त धूलिवंदन साजरे केले. राम मंदिर परिसरात हा कार्यक्रम झाला. प्रभातफेरीच्या सर्व सदस्यांनी एकमेकांना नैसर्गिक रंगाचा टिळा लावून व फुलांच्या पाकळ्या उधळून आनंदोत्सव साजरा केला.
राधेश्याम लाहोटी, संजय अग्रवाल, जे.बी.कोटेचा, अर्जुन पटेल, लीलाधर अग्रवाल, मदन बोरकर, श्याम अग्रवाल, गोपाल तिवारी, गोपाल जांगीड, सुनील लाहोटी आदींची उपस्थिती होती. याशिवाय शहरातील विविध चाैकांमध्ये राजकीय पक्षांचे पदाधिकारी, माजी नगरसेवकांनी देखील कार्यकर्त्यांसह धुलिवंदनाचा आनंद घेतला. म्युनिसिपल पार्कमध्ये भाजपचे शहराध्यक्ष परीक्षित बऱ्हाटे, माजी नगरसेविका दीपाली बऱ्हाटे यांनी प्रभागातील रहिवाशांसह नैसर्गिक रंगांचा वापर करून धूलिवंदन साजरे केले. आनंद नगरात भगवा ग्रुपने गुलालाची उधळण केली.
तरुणाईचा जल्लोष : लाेखंडी पुलाजवळ हिंदू हाेय मंडळातर्फे धुळवड साजरी झाली. वाद्याच्या तालावर थिरकत तरुणाई एकमेकांना रंगाने माखत होती. मातृभूमी चाैकात माजी नगरसेवक किरण काेलते यांनी धुलीवंदनाचे आयोजन केले होते.
पोलिस ठाण्यात रंगोत्सव
बाजारपेठ पोलिस ठाण्यातही पोलिसांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने रंगोत्सव साजरा केला. बाजारपेठ पोलिस ठाण्यात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकमेकांना रंग लावून, होळीच्या शुभेच्छा दिल्या. या उपक्रमात केवळ पर्यावरणपूरक रंगांचाच वापर करण्यात आला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.