आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपद्रव वाढूनही पालिकेने फवारणी:नागरिकांची गांधीगिरी; पदरमोड करून फवारणी

भुसावळ6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात डेंग्यूचे रुग्ण व डासांचा उपद्रव वाढूनही पालिकेने फवारणी व धूरळणी केली नाही. त्यामुळे शहरातील शांती नगरातील सागर अपार्टमेंटमधील रहिवाशांनी स्वखर्चाने परिसरात धूरळणी व फवारणी केल्याची माहिती रहिवासी दिलीप ठाकूर यांनी दिली.

गेल्या पंधरवड्यापासून शहरात डेंग्यूने डोके वर काढले आहे. आतापर्यंत ८ रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाने कंटेनर सर्वेक्षणावर भर दिला आहे. मात्र, त्यात कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन करण्यापलीकडे इतर धूरळणी किंवा फवारणी सारख्या उपाययोजना होताना दिसत नाही. यामुळे डासांचा उपद्रव वाढून अनेक भागात सायंकाळी घराबाहेर निघणे कठीण होते. त्यामुळे सागर अपार्टमेंटमधील रहिवाशांनी वर्गणी जमा करुन फवरणीसाठी साडेतीन हजार रुपयांचा पंप व ६०० रुपयांचे कीटकनाशक खरेदी केले. यानंतर अपार्टमेंट व परिसरात फवारणी केली. यापूर्वी काही नगरसेवकांनी शहरात पदरमोड करून कामे केली. आता पालिकेच्या कर दात्यांनी गांधीगिरी केल्याचा प्रकार परिसरात चर्चेचा विषय ठरला.

बातम्या आणखी आहेत...