आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध कार्यक्रम आयोजित:फार्मसी कॉलेजमध्ये गणेशोत्सव

फैजपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील लोकसेवक मधुकरराव चौधरी कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये गणपती महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम साजरे होत आहे. त्यात शनिवारी सकाळी महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांच्या हस्ते श्रींची आरती झाली. नंतर विद्यार्थ्यांकडून शिरखुर्मा पार्टी, प्रश्नमंजुषा, भावगीत गायन, दांडिया असे विविध कार्यक्रम आयोजित केले होते.

उत्कृष्ट कलागुण सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष आमदार शिरीष चौधरी, धनंजय चौधरी, एपीआय सिद्धेश्वर आखेगावकर, मुख्याधिकारी वैभव लोढे यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. प्राचार्य डॉ.व्ही.आर.पाटील, माजी नगरसेवक केतन किरंगे, कुर्बान शेख, जफर शेख, मेहबूब पिंजारी, इरफान शेख, कलीम खान मन्यार, फिरोज खान यांची उपस्थिती होती. प्रा.नीलम पाटील, विद्यार्थिनी महेक फिरोज खान पठाण, शेख नबिल मतीन यांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...