आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्वतयारी:एक खिडकी योजनेत पाच दिवसांत मिळणार गणेशोत्सवाची परवानगी

भुसावळ6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सव साजरा करताना सार्वजनिक मंडळांना वेगवेगळ्या परवानग्या घ्याव्या लागतात. त्यासाठी कागदपत्रांची जमवाजमव करावी लागते. यासाठी लागणारा वेळ आणि दगदगीमुळे कार्यकर्ते त्रस्त होतात. मात्र, प्रशासनाने संपूर्ण शहरातील मंडळांच्या सोयीसाठी शहर पोलिस ठाण्यात एक खिडकी योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. १ ऑगस्टपासून या खिडकीवर कागदपत्रांची पूर्तता केल्यावर पाच दिवसांत परवानगी मिळेल.

भुसावळ शहरात दरवर्षी १६५ सार्वजनिक गणेश मंडळांतर्फे श्रींची स्थापना केली जाते. या सर्वांकडून बाप्पाचे जल्लोषात आगमन होते. भव्यदिव्य मूर्ती, उत्सव काळात आकर्षण रोषणाई, देखावे, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले जातात. मात्र, कोरोनामुळे गेली दोन वर्षे गणेशोत्सव साजरा करण्यावर निर्बंध होते. श्री गणेश मूर्तीच्या उंचीला देखील मर्यादा घालून दिली होती. आता कोरोना नियंत्रणात असल्याने सरकारने उत्सवावरील निर्बंध हटवले आहेत. यामुळे सार्वजनिक मंडळे व गणेशभक्तांमध्ये उत्साह आहे. त्यांनी आतापासून ३१ ऑगस्टला सुरूवात होणाऱ्या गणेशोत्सवाची तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे पोलिस प्रशासनाने देखील मंडळांच्या सोयीसाठी एक खिडकी योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बाजारपेठ व शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मंडळांना ३ ते १८ वयोगटातील अशा शाळाबाह्य मुलांचा शोध व नोंद घेण्यासाठी शहर आणि तालुक्यात मिशन झिरो ड्रॉपआऊट राबवण्यात आले.

५ ते २० जुलैदरम्यान या मोहिमेत तब्बल ४३ हजार ९९३ बालकांची माहिती संकलित करण्यात आली. त्यापैकी एकही बालक शाळाबाह्य नाही. यापैकी २३ हजार ३६६ मुले व २० हजार ६२७ मुली अंगणवाडीपासूनa दहावी पर्यंतच्या वर्गांत शिक्षण घेत आहेत. तर २७३ कुटुंबातील बालके विशेष गरजाधिष्ठीत यादीत आहेत. पहिली ते १२ वी पर्यंतच्या वर्गांत शाळेत जाऊ शकणारे मात्र शाळाबाह्य असलेले एकही बालक या सर्वेक्षणात आढळले नाही.

परवानगीसाठी मंडळांनी ही कागदपत्रे सादर करावी गणेशोत्सवाची परवानगी मागताना पोलिसांकडे अर्ज सादर करावा लागेल. त्यात गणपती बसण्याची जागा (जागा विवादित नकाे), पालिकेची एनओसी, गेल्या वर्षीची परवानगीची प्रत, मंडळ पदाधिकाऱ्यांचे अाधारकार्ड, धर्मदाय अायुक्तांचा दाखला, स्थापना मिरवणूक व विसर्जन मिरवणुकीचा मार्ग, मिरवणूक सुरू होण्याची व विसर्जनाची वेळ नमूद करावी लागेल. मंडपामुळे रस्त्यावरील वाहतुकीला अडचण होणार नाही, याची हमी द्यावी लागेल. शिवाय प्रत्येक मंडळांना ही सर्व कागदपत्रे ऑनलाइन सादर करावी लागतील.

वीज कर्मचारी नेमणार शहर पोलिस ठाण्यातील एक खिडकी योजनेत शहर पोलिस ठाण्याचे हवालदार प्रमोद पाटील, राजेश बाेदडे, बाजारपेठचे संदीप परदेशी व पालिकेचे कर्मचारी नेमले आहेत. वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी होकार दिल्यास त्यांचा कर्मचारी नेमला जाईल. वीज कंपनीशी निगडीत परवानगी देखील मंडळांना येथून देण्याचे नियोजन आहे.

मूर्तीची उंची कमी ठेवा, सामाजिक उपक्रम राबवा
यंदा मूर्तीच्या उंचीची मर्यादा हटवली आहे. तरीही भुसावळकरांनी मूर्तीची उंची चार ते पाच फुटांपर्यंत ठेऊन चांगला पायंडा पाडावा. प्रत्येक सार्वजनिक मंडळाने नियमानुसार परवानगी घेऊनच श्रींची स्थापना करावी. त्यासाठी एक खिडकी योजना सुरू करत आहोत. सुरक्षेसाठी मंडळ परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावावे, स्वतंत्र सुरक्षा यंत्रणा ठेवावी. उत्सव काळात सामाजिक, प्रबोधनात्मक उपक्रम राबवावे.
साेमनाथ वाघचाैरे, डीवायएसपी, भुसावळ

बातम्या आणखी आहेत...