आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेठडी:रेल्वेतून गांजा तस्करीचे  धागेदोरे चोपड्यापर्यंत ; सोमवारी बसस्थानक भागात पोलिसांची कारवाई

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरपीएफने शुक्रवारी जळगाव ते मनमाड दरम्यान कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये सव्वा लाख रुपयांचा गांजा पकडला हाेता. हा गुन्हा मनमाड लोहमार्ग पोलिसांनी भुसावळ लोहमार्ग पोलिसांत वर्ग केला होता. या प्रकरणी अटकेतील शमशोद्दीन ऐनोद्दीन पिंजारी (वय ६२, रा.मालेगाव, जि.नाशिक) याने दिलेल्या माहितीवरून लोहमार्ग पोलिसांनी चोपड्यातून हासीराम चाैहाण याला अटक केली. उपनिरीक्षक राजेंद्र पाटील, अजीत तडवी, जगदीश ठाकूर, धनराज लुले, संजय मिर्झापुरे यांनी सोमवारी बसस्थानक भागात ही कारवाई केली. आरोपीला बुधवारपर्यंत पाेलिस काेठडी मिळाली.

बातम्या आणखी आहेत...