आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्ग एकेरी:गवळीवाडा, पांडुरंग चौक; मामाजी टाॅकीज मार्ग एकेरी

भुसावळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील हंबर्डीकर चौक ते लोखंडी ब्रिज या कामाच्या रस्ता काँक्रिटीकरण कामाला मंगळवारी सुरुवात झाली. यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. रेल्वे रुळांमुळे विभाजन झालेल्या शहरातील दोन्ही भागांना जोडण्यासाठी आता केवळ सतारे ब्रिज या मुख्य मार्गाचा पर्याय आहे. सतारे ब्रिजला जोडणाऱ्या गवळी वाडा व मामाजी टॉकीज रोडवरून एकेरी वाहतूक केली आहे. जळगाव रोडवरून जामनेर रोडवर जाण्यासाठी गवळी वाडा तर जामनेर रोडवरून जळगाव रोडवर येण्यासाठी मामाजी टॉकीज रोड अशी वाहतूक होईल. या मार्गावर मंगळवारी शहर व वाहतूक पोलिसांनी निर्माण होणारे अडथळे हटवले.

पालिकेने सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेंतर्गत श्री संत गाडगेबाबा रुग्णालय ते लोखंडी पूल या मार्गावरील रस्ता काँक्रिटीकरण कामास सुरुवात केली. यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. शहरातील रेल्वे रुळांमुळे दोन भाग झालेल्या शहराला जोडण्यासाठी हा सर्वांत अधिक वापराचा व महत्वाचा मार्ग पुढील किमान ३६ दिवस बंद राहील. यामुळे आता गवळी वाडा, मामाजी टॉकीज रोडवरून सतारे ब्रिजमधून वाहतूक होईल. सतारे ब्रिजला जळगाव व जामनेर रोडला वाहतुकीसाठी गवळीवाडा व मामाजी टॉकीज या दोन मार्गांवरुन जाता येईल. या ठिकाणी एकेरी वाहतूक करण्यात आली आहे.

खड्डेमय रस्त्याचा प्रश्न सुटेल
हंबर्डीकर चौक ते लोखंडी पुलापर्यंतच्या रस्त्याचे काम युध्द पातळीवर पूर्ण केले जाईल. व्यापाऱ्यांना नुकसान होऊ नये, यासाठी हे काम जलदगतीने करु. दुसऱ्या टप्प्यात पालिका रुग्णालय ते हंबर्डीकर चौकापर्यंतचा रस्ता होईल. काही दिवस नागरिकांना त्रास होईल, मात्र खड्डेमय रस्त्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटेल. - योगेश पाटील, संचालक, चतुर्भुज कन्स्ट्रक्शन, भुसावळ.

बातम्या आणखी आहेत...