आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावीचा निकाल:90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेणाऱ्यांमध्ये मुलींचे प्रमाण अधिक; स्वयंअध्ययनातून यशाला गवसणी

भुसावळ14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बुधवारी दहावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर झाला. यंदादेखील भुसावळ शहरातील अनेक विद्यालयांनी निकालात १०० टक्के बाजी मारली. विद्यार्थ्यांना बऱ्याच विषयांत पैकीच्या पैकी गुणदेखील मिळाले. तसेच ९० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्यादेखील समाधानकारक आहे. त्यात विद्यार्थिनींची संख्या अधिक आहे. कोरोनाच्या संकटकाळात विद्यार्थ्यांनी भीतीवर मात करून यश खेचून आणले.

सर्वोदय हायस्कूलचा निकाल ९५.४५ टक्के
वरणगाव|किन्ही येथील सर्वोदय हायस्कूलचा दहावीचा निकाल ९५.४५ टक्के लागला. परीक्षेसाठी केंद्रावर १३२ विद्यार्थी प्रविष्ट होते, त्यापैकी १२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.शाळेतून प्रथम क्रमांक सौरव नारायण पाटील याने ९१ % गुणांसह मिळवला. द्वितीय क्रमांक आर्यन अर्जुन चौधरी याने ९०.६० % गुणांसह मिळवला. तर कल्याणी मनोज सोनवणे व देवयानी संजय सांबरकर यांनी ९०.४० % गुण मिळून तृतीय क्रमांक मिळवला. यशस्वी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले. अध्यक्ष नरेंद्र भिरुड, चेअरमन मधुकर चौधरी, सेक्रेटरी संजय चौधरी, ज्ञानदेव चौधरी, नामदेव पाटील, अनिल चौधरी, नामदेव पाटील, ज्ञानदेव चौधरी, अरुण चौधरी, प्रविण फिरके, प्रदीप ढाके, सुनील भिरुड, मुख्याध्यापक डी.पी.साळुंके, पर्यवेक्षक डी.सी.बाविस्कर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

कुऱ्हे पानाचेत रा.धो. विद्यालयातील १३ विद्यार्थी नव्वदीपार येथील राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल ९२.८० टक्के लागला. १३ विद्यार्थी ९० टक्केपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. मकरंद सुनील बारी व रोशनी संजय पवार यांनी समान ९५.४० टक्के मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक अश्विनी गोपाळ अस्वार (९५टक्के), तर दर्शन घनश्याम बडगुजर व विवेक ज्ञानेश्‍वर भोई यांनी (९४.६० टक्के) गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. एकूण १२५ विद्यार्थी प्रविष्ट होते. त्यापैकी ७४ विद्यार्थी विशेष प्रावीण्य मिळवून, २७ विद्यार्थी फर्स्ट क्लास, १३ विद्यार्थी सेकंड क्लास व २ विद्यार्थी पास असे एकूण ११६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाळेचा एकूण निकाल ९२.८० टक्के लागला आहे. ग्रामविकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष एकनाथ बडगुजर, उपाध्यक्षा भावना बडगुजर, सचिव प्रमोद छाजेड, संचालक मंडळ, मुख्याध्यापक आर.व्ही.गवळी, पर्यवेक्षक एस.डी.वाघ यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

प्रकाश विद्यालयाचा दहावीचा निकाल ९६ टक्के
मोठे वाघोदे येथील प्रकाश विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल ९६.१५% लागला. हेमंत सोनजी अत्रेने ९४.६०% मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. तर ऋतुजा तुषार पाटील ही विद्यार्थीनी ९३.२०% मिळवून द्वितीय आली. व तृतीय क्रमांक ९२.८०% गुण मिळवून प्राजक्ता विश्वनाथ महाजन व चौधरी सानिका रविंद्र या विद्यार्थीनींनी मिळवला. तसेच मागासवर्गीयांतून नेहा भिमराव वाघ ही विद्यार्थीनी ८९.८०% गुण मिळवून प्रथम आली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष पी. टी. महाजन, उपाध्यक्ष श्रावण महाजन, चेअरमन डी. के. महाजन, सचिव किशोर पाटील, सहसचिव पी.एल. महाजन, मुख्याध्यापक व्ही. एस. महाजन, पर्यवेक्षक आर. पी. बडगुजर यांच्यासह शिक्षकांनी अभिनंदन केले. गुणवंतांचे ग्रामस्थांनीही कौतुक केले.

चि. स. महाजन शाळेचा निकाल लागला ८८%
जामठी चि.स.महाजन शाळेचा, निकाल ८८.८८% लागला. हर्षल गणेश मराठेने ९१.४०% प्रथम, दुर्गेश राजेंद्र सत्रेने ९०.४०% द्वितीय, तनुजा मनोज कुडोगरेने ८८.६०% तृतीय क्रमांक मिळवला. अध्यक्ष अशोक सत्रे, सचिव भगवान महाजन, के.आर.पाटील, एस. टी. कोळी यांनी कौतुक केले.

चिनावल विद्यालयाची यशाची परंपरा कायम
शिक्षण प्रसारक मंडळ, संचलित नूतन माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल ९७.२२ टक्के लागला. दहावी परीक्षेसाठी विद्यालयातून एकूण १८० विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते, त्यापैकी १५८ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. विद्यालयातून तेजस ललित चौधरी हा ९६ टक्के मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. तसेच हेमंत योगेश बोरोले व योगिनी चंद्रशेखर पाटील हे ९५ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांकाने. तर डिगेश्वरी जगदीश भंगाळे, कृष्णा सुधाकर गोसावी व लक्षित युवराज सरोदे हे ९४.८० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष किरण नेमाडे, चेअरमन किशोर बोरोले, सेक्रेटरी गोपाळ पाटील व सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक एच.आर.ठाकरे, उपमुख्याध्यापिका मिनल नेमाडे, पर्यवेक्षक पी.एम.जावळे यांनी अभिनंदन केले.

उमेश्वर विद्यालयाचा निकाल ९०.११ टक्के
तांदलवाडी | दसनूर (ता.रावेर) येथील उमेश्वर माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९०.११ टक्के लागला. विद्यालयातून श्रेया सुभाष महाजन हिने ९४ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. रिद्धी विकास चौधरी व कृष्णल रविंद्र कोळी यांनी ९३.८० टक्के गुणांसह द्वितीय तर निलेखा किशोर चौधरी ९३.६० टक्के गुण मिळवून तृतीय आली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रल्हाद महाजन, उपाध्यक्ष जगन्नाथ महाजन, चेअरमन राजेंद्र महाजन, सचिव दत्तात्रय चौधरी, सर्व संचालक, मुख्याध्यापक एस. जी. महाजन,पर्यवेक्षक आर.एल.तायडे यांनी अभिनंदन केले. प्रशासकीय सेवेत करिअर करण्याचा मानस गुणवंतांनी व्यक्त केला.

कुसुमताई चौधरी विद्यालयाचा निकाल १०० टक्के
फैजपूर कुसुमताई मधुकरराव चौधरी माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९६ टक्के लागला. सुशांत प्रशांत बारीने ९६.६०% गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. द्वितीय क्रमांक गुंजन विजय जैन (९६.२०%), तृतीय क्रमांक अपर्णा प्रताप चौधरी (९६%) यांनी मिळवला. संस्थेचे अध्यक्ष आमदार शिरीष चौधरी, उपाध्यक्ष पंडित कोल्हे, उपाध्यक्ष मोहन महाजन, चेअरमन प्रमोद चौधरी, व्हाईस चेअरमन पांडुरंग सराफ, सचिव डॉ.उमेश चौधरी, सहसचिव प्रा.विलास बोरोले, सदस्य हिमा चौधरी, सदस्य अशोक पाटील, सदस्य हर्षद गुजराथी, मुख्याध्यापक एस.जे.तळेले, बी.एम.बोंडे यांच्यासह गुणवंतांच्या पालकांनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...