आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्मसंरक्षण व सायबर सुरक्षा विषयावर समुपदेशन:आपल्या वर्तणुकीतून मजबूर नव्हे, मजबूत असल्याचा संदेश द्या

भुसावळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डोळे व कान उघडे ठेऊन आजूबाजूच्या घटना पाहिल्या, ऐकल्या तर पदोपदी धोके असल्याचे लक्षात येईल. मात्र, अशा स्थितीत न घाबरता थोडीशी सावधगिरी बाळगली तर पुढे घडणाऱ्या वाईट घटना आपण टाळू शकतो. अशाही स्थितीत काही वाईट प्रसंग उद््भवात तर हिंमतीने प्रतिकार करा. आपल्या वर्तणुकीतून समाजाला आम्ही मजबूर नव्हे तर मजबूत आहोत, असा संदेश देण्याचे आवाहन समुपदेशक आरती चौधरी यांनी विद्यार्थिनींना केले.

शहरातील अहिल्यादेवी कन्या विद्यालयात इनरव्हील क्लब ऑफ रेल सिटी भुसावळतर्फे आत्मसंरक्षण व सायबर सुरक्षा या विषयावरील कार्यशाळेत त्या बोलत होत्या. अध्यक्षा प्रतीक्षा पाटील, रेवती मांडे, माेना भंगाळे, डाॅ. मृणाल पाटील, सुनीता पाचपांडे, प्रभा पाटील आदी उपस्थित होते. बदलणाऱ्या काळात मुलींनी स्वत:चे संरक्षण कसे करावे? समाजात वावरताना कशी काळजी घ्यावी? यावर आरती चाैधरींनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, छोट्या छोट्या गोष्टी आहेत तिथे आपण काळजी घेतली तर धोके टाळू शकतो. कारण महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला वय नसते. लहान मुलींपासून ते वृद्ध महिलादेखील अत्याचाराचा बळी ठरल्या आहेत. त्यामुळे युवतींनी स्वतःला सक्षम करणे गरजेचे आहे. कोणतीही घटना घडायची वाट न पहाता धोक्याची सूचना मिळताच सावध व्हा. सार्वजनिक ठिकाणी आपल्या वर्तणुकीचे भान ठेवा, असा सल्ला देखील दिला.

छायाचित्र अपलोड करताना काळजी घ्या
प्रत्येक मुलीने घराबाहेर पडताना स्वत:जवळ सेफ्टी पिन, हेअर पिन, पेन, बॅग सोबत ठेवावी. या साधनाचा वापर करून तुम्ही ऐनवेळी स्वत:चा बचाव करू शकतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मानसिकदृष्ट्या खंबीर व्हा. इंटरनेटवर सोशल मीडियाचा सुरक्षित वापर करा. ई-मेल, फेसबुक यावर फोटो अपलोड करताना खबरदारी घ्यावी. फेसबुक, ई-मेलचे पासवर्ड काेणालाही सांगू नये, असा सल्ला दिला.

बातम्या आणखी आहेत...