आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रबोधन:अंधविश्वास सोडा; साक्षर, डोळस व्हा‎ ; मानवसेवा संघाच्या कार्यक्रमात प्रा.डॉ.जतीन मेढे यांचे प्रतिपादन‎

भुसावळ‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

फुले दाम्पत्याने आम्हाला साक्षर करण्यासाठी ‎ अपार कष्ट सोसले. समाजाकडून होणारा‎ अतोनात छळ सहन केला. स्री शिक्षणाची‎ मुहूर्तमेढ रोवली. परंतु दुर्दैवाने आपण आजही ‎खऱ्या अर्थाने साक्षर झालेलो आहोत का?‎ असा प्रश्न पडतो. अंधविश्वास, अनावश्यक ‎रूढी-परंपरांना आपण अजूनही कवटाळून‎ बसलो आहोत. हे रोखायचे असेल तर‎ विज्ञानाची कास धरायला हवी. डोळस बनू या, असे आवाहन प्रा.जतीन मेढे यांनी केले.‎ मानव सेवा ईश्वर सेवा कल्याण संघ आणि ‎क्रांतीसूर्य प्रतिष्ठानतर्फे दीपनगरच्या नवीन‎ क्रीडा भवनात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले‎ यांची १९२ वी जयंती साजरी करण्यात आली.‎ अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता मोहन आव्हाड,‎ तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य अभियंता विवेक‎ रोकडे, भेलचे महाव्यवस्थापक दिनेश जवादे,‎ नीलिमा आव्हाड, सहायक पोलिस निरीक्षक‎ रुपाली चव्हाण, उप मुख्य अभियंता मनोहर‎ तायडे, उप मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी‎ मुकेश मेश्राम, अधीक्षक अभियंता सुमेध‎ मेश्राम आणि महेश महाजन प्रकल्प, शेख‎ शब्बीर, प्रदीप पाटील उपस्थित होते. एपीआय‎ रुपाली चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.‎

कर्तृत्ववान महिलांसोबत मान्यवर, मानवसेवा इश्वर सेवा कल्याण संघाचे पदाधिकारी.‎ महिलांचा केला गौरव पिंप्रीसेकम, फुलगाव, कपिलवस्तू नगर, निंभोरा, फेकरी आणि‎ दीपनगर परिसरातील कतृत्ववान महिलांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार देण्यात‎ आला. शारदा जितेंद्र वारके (रा.पिंप्रीसेकम), माया मंगलदास रनीत (रा.कपिल नगर), रंजना‎ बाळ तांबे (रा.निंभोरा), पूनम प्रमोद प्रधान (रा.कपिल नगर) यांचा कार्यक्रमात गौरव झाला.‎

बातम्या आणखी आहेत...