आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील मुख्य बाजारातील मरिमाता मंदिर परिसरातील गणेश मॉलजवळ दीड वर्षापासून भूमिगत केबलचे जंजाळ जैसे थे आहे. यामुळे दुचाकी स्लिप होण्याचे अनेक प्रकार घडूनही महावितरण केबल उचलण्यास टाळाटाळ करत आहे. सोबतच प्रमुख मार्गावरील सेंट्रल पोलवरही इंटरनेट प्रोव्हायडर्स व टीव्ही नेटवर्किंग केबलचे अनधिकृत जंजाळ वाढले आहे.
महावितरणने शहरातील बाजारपेठ भागात भूमिगत वीज वाहिनीचे नियोजन केले होते. गेल्या दीड ते दोन वर्षांपूर्वी न्यू एरिया ब्राह्मण संघापासून भूमिगत वीज वाहिनीचे काम सुरु झाले. गणेश मॉलपर्यंत काम पूर्ण होऊन नंतर त्यास ब्रेक लागला. उर्वरित केबल याच ठिकाणी गुंडाळून ठेवण्यात आली. हळुहळू ही केबल रस्त्यापर्यंत सरकल्याने दररोज किरकोळ अपघात होतात. सोबतच शहरातील शहरात प्रमुख मार्गावरील सेंट्रल पोलवर केबल नेटवर्किंग तसेच शहरात इंटरनेटची सुविधा पुरवणाऱ्या विविध खासगी कंपन्यांच्या केबलचे जंजाळ निर्माण झाले आहे. या केबल व इंटरनेट प्रोव्हायडर्स कंपन्यांवर कोणत्याही विभागाचे नियंत्रण नाही. अवजड केबलमुळे काही ठिकाणी पोल वाकल्याच्या घटना समोर आल्या आहेत. शहरातील गांधी पुतळ्याजवळ एक पोल वाकला असून तो कोसळण्याची भीती आहे. ही स्थिती जळगाव रोड, यावल रोडवर आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.