आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव‎:दहिगाव, साकळी उपकेंद्रात‎ लाइनमनच्या कार्याचा गौरव‎

यावल‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील दहिगाव व साकळी‎ वीज उपकेंद्रात राष्ट्रीय लाइनमन‎ दिन साजरा करण्यात आला.‎ यावेळी लाइनमन कर्मचाऱ्यांना‎ गौरवण्यात आले. कर्मचाऱ्यांनी‎ सुरक्षा साधने वापरण्याची शपथ‎ घेतली.‎ दहिगाव येथील उपकेंद्रात सर्व‎ दिवंगत वीज सैनिकांना श्रंध्दाजली‎ वाहण्यात आली. रात्रंदिवस‎ अविरतपणे प्रत्येक घराघरात अखंड‎ वीज पुरवण्यासाठी, परिश्रम‎ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा‎ देण्यात आल्या.

सहाय्यक अभियंता‎ जे. के. धांडे, लाइनमन सलीम‎ तडवी, अरमान तडवी, उस्मान‎ तडवी, खलील तडवी, अबरार‎ खान, आदील पटेल, महेश तायडे,‎ रूपेश भारूडे, हसन अली उपस्थित‎ होते. साकळी उपकेंद्रात कक्ष प्रमुख‎ सहाय्यक अभियंता नीलेश महाजन‎ यांनी वीज कर्मचाऱ्यांचा सत्कार‎ केला. यावेळी प्रधान तंत्रज्ञ विलास‎ तायडे, दिनकर माळी, रमजान‎ तडवी, खेमकांत सोनवणे, नितीन‎ पाटील, नबाब तडवी, असलम‎ तडवी, व्यंकटेश बारी, हसन तडवी,‎ बंडू कुंभार, अय्युब तडवी, भूषण‎ सोनवणे, दाऊद तडवी, पप्पू‎ महाजन उपस्थित होते.‎ जनमित्रांच्या कार्याचा गौरव केला.‎

बातम्या आणखी आहेत...