आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला दिन विशेष:‘अनुश्री’ संस्थेतर्फे‎ नारीशक्तीचा गौरव‎; जागतिक महिला दिनानिमित्त‎ कार्यक्रमाचे आयोजन

भुसावळ‎6 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

जागतिक महिला दिनानिमित्त‎ भुसावळ येथील अनुश्री महिला‎ बहुउद्देशीय संस्था आणि भुसावळ‎ तालुका विधी सेवा प्राधिकरणाने‎ सौनिकांच्या वीर पत्नी, कन्यारत्न‎ प्राप्त महिला आणि विविध क्षेत्रात‎ कार्य करणाऱ्या महिलांना‎ सन्मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन‎ सन्मानित केले.‎ कार्यक्रमात अॅड. जास्वंदी‎ भंडारी, पोलिस मित्र संघटनेच्या‎ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संगीता‎ भांबरे, वीरपत्नी प्रतिभा बावस्कर,‎ प्रभूंची छाया अनाथाश्रमाच्या‎ संचालिका रिना कदम, नीता पाटील‎ जिनी पोहेकर, लता सावकारे, वर्षा‎ खडताळे, वैशाली चोपडे आदी‎ उपस्थित होत्या.‎ संस्थेच्या अध्यक्षा जयश्री इंगळे‎ यांनी शिवणकामाची माहिती‎ दिली.अॅड.भंडारी यांनी‎ महिलांविषयक कायद्याची माहिती‎ दिली. संगीता भांबरे यांनी स्वावलंबी‎ होण्याबाबत मार्गदर्शन केले.‎ यशस्वितेसाठी महिला‎ पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.‎

बातम्या आणखी आहेत...