आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रभाग पाचमध्ये आयोजित कार्यक्रमात कोरोना काळात भुसावळकरांना आरोग्यसेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, नर्स, आशा स्वयंसेविकांचा गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी रजनी सावकारे, तर खासदार रक्षा खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. म्युनिसिपल पार्कमध्ये माजी प्रभारी नगराध्यक्ष राजेंद्र नाटकर, माजी नगरसेविका शाेभा नाटकर, विशाल नाटकर, साेनल नाटकर, नितीन व रश्मी नाटकर यांनी कार्यक्रमाचे आयाेजन केले हाेते. मीना लाेणारी, दीपाली बऱ्हाटे, संगीता बियाणी, साेनल महाजन, शैलजा पाटील, डाॅ. कीर्ती फलटणकर, सुषमा पाटील, अनिता आंबेकर, अलका शेळके, संजीवनी तायडे उपस्थित हाेते. खासदार खडसेंनी संवाद साधला.
के.नारखेडे विद्यालय
के.नारखेडे विद्यालयात विद्यार्थिनींनी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या भूमिका, वेशभूषा साकारल्या. पर्यवेक्षक एस.एल.राणे, मुख्याध्यापक एन.बी.किरंगे, पर्यवेक्षक वाय.एन.झोपे, उप मुख्याध्यापक आर.ई.भोळे उपस्थित होते. एम.आर.सोनवणे , एस.व्ही.सपकाळे , डी. एम. हेलोडे यांनी सहकार्य केले. एस.एस.पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन खुशबू तडवी व भाग्यश्री जगताप यांनी केले.
जैन धर्मियांतर्फे सत्कार
जैन धर्मियांतर्फे कांताबाई सुराणा, प्रभावती सुराणा, राधाबाई चोरडीया, विमल काेटेचा, सुशीला चाेरडीया, डाॅ.शीतल चाेरडीया, वीणा लाहाेटी, भवरबाई सुराणा, चमकुबाई आेसवाल, सुनीता नहार, कल्पना चाेरडीया यांचा सत्कार झाला. माजी नगरसेवक निर्मल काेठारी, गाैतम चाैरडीया, कांतीलाल चाेरडीया, राजेश बाफना आदींची कार्यक्रमाला उपस्थिती होती.
दीपनगरात एकपात्री कॉमेडी शो रंगला
दीपनगरात महाराष्ट्र वीज कामगार महासंघ भुसावळ झोन(निर्मिती) तर्फे पदाधिकारी,कार्यकर्ते, सभासदांचा पारिवारिक मेळावा पार पडला. त्यात मंगेश ठाकरे यांच्या एकपात्री कॉमेडी शोचे आयाेजन केले हाेते. अध्यक्षस्थानी म.वि.का.महासंघाचे अध्यक्ष विठ्ठल भालेराव, तर उद्घाटक म्हणून दीपनगर वीज केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड, कार्याध्यक्ष वसंत काळे,उपमहामंत्री विठ्ठल बागल, महामंत्री एस. झेड. भावसार, सुरेश सोनार,ए. बी. ठाकूर , अनंत जाधव, सचिन पाटील, कामगार कल्याण अधिकारी पंकज सनेर, डी. के. झासकर, सचिन लाडवंजारी, डॉ. राेहिणी गायकवाड, ओंकार नागले, कृष्णा मैत्रेय उपस्थित होते. झोन सचिव संजय तायडे यांनी प्रस्ताविक, सूत्रसंचालन प्रियंका शेळके यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.