आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीएम सुरक्षा:मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील 3 कर्मचाऱ्यांना जीएम सुरक्षा पुरस्कार

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी चांगले काम करून रेल्वेची होणारी संभाव्य दुर्घटना टाळण्यात आणि रेल्वे संचालनात सुरक्षितता सुनिश्चित करण्यात त्यांचे योगदान दिल्याबद्दल भुसावळ विभागातील तीन कर्मचाऱ्यांसह मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना मंगळवारी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांच्या हस्ते महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्कार मुंबईत प्रदान करण्यात आले.

पुरस्कार मिळालेल्या ११ कर्मचाऱ्यांमध्ये भुसावळ विभागातील तीन, मुंबई विभागातील तीन, नागपूर विभागातील दाेन, पुणे विभागातील दाेन आणि सोलापूर विभागातील एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात जुलै-ऑगस्ट २०२२ या महिन्यात कर्तव्यादरम्यान कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेचा, अनुचित घटना टाळण्यात आणि रेल्वे संचालनात सुरक्षितता सुनिश्चित करण्यात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल कौतुक म्हणून हे पुरस्कार देण्यात आले. या पुरस्कारांमध्ये पदक, प्रशंसा प्रमाणपत्र, अनुकरणीय सुरक्षा कार्याचे प्रशस्तिपत्रक आणि दाेन हजार रोख रुपयांचा समावेश आहे.अनिलकुमार लाहोटी यांनी यावेळी सांगितले की, पुरस्कार विजेत्यांनी प्रशंसनीय काम केले आहे, सुरक्षित कामासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी दाखवलेली सतर्कता इतरांना प्रेरणा देईल. तेही प्रवाशांच्या सुरक्षेसाठी काम करतील.

यांचा झाला मुंबईत गौरव
भुसावळ विभागातील मास्टर क्राफ्ट्समन, कॅरेज आणि वॅगन वर्कशॉपमधील कृष्ण वनारे, सहाय्यक, कॅरेज आणि वॅगन वर्कशॉपमधील नीलेश तुळशीराम इंगळे, ट्रॅक मेंटेनर, मोहम्मद इद्रिस शेख इस्राईल यांना महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्कार प्रदान केले.

बातम्या आणखी आहेत...