आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडाेनेपाळ:आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळाडूंना सुवर्णपदक ; विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेपाळ येथे १ ते ५ डिसेंबर या काळात झालेल्या इंडाेनेपाळ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चार देशांनी सहभाग घेतला हाेता. त्यात जळगाव व धुळे जिल्ह्यातील खेळाडूंनी मैदानी स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले. नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारत, नेपाळ, चीन, भूतान या देशांनी सहभाग घेतला होता. त्यात ममता जांगिड (१०० मीटर), मनीषा मोरे (२०० मीटर), तेजस्विनी तायडे (४०० मीटर) यांनी सुवर्ण पदक प्राप्त करून जळगाव जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावले. यापूर्वी देखील या खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...