आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छाननी पूर्ण:ग्रा.पं.निवडणूक, आज माघारीचा शेवटचा दिवस ; लढतींचे स्वरूप स्पष्ट होताच चुरस वाढणार

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील ६ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. त्यात सोमवारी झालेल्या छाननीत सरपंच पदाचे सर्व ३१, तर सदस्य पदाच्या ५६ जागांसाठी १४४ उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. आता बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंत माघारीची मुदत आहे. यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होईल. तालुक्यातील तळवेल, पिंपळगाव खुर्द, ओझरखेडा, कन्हाळे बुद्रुक, कन्हाळे खुर्द, माेंढाळा या सहा ग्रामपंचायतींची निवडणूक हाेत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करणे व छाननी पूर्ण होऊन आता माघारीची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंत माघारीची मुदत असून त्यानंतर चिन्ह वाटप होईल. दरम्यान, माघारीवरच निवडणुकीची समीकरणे अवलंबून आहेत. त्यासाठी गावातील व तालुक्यातील पुढाऱ्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. या निवडणुकीत एकुण २० प्रभागांसाठी २२ केंद्रांवर मतदान होईल. १८ डिसेंबरला होणाऱ्या या मतदानासाठी प्रशासनाने निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...