आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षण सोडत:जि.प.आरक्षण पदाधिकाऱ्यांना सुरक्षित गटांचा शोध ; भाजप-राष्ट्रवादीला साेईचे; शिवसेना, शिंदेसेनेची काेंडी

जळगाव/भुसावळ6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेच्या ७७ गटांसाठी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षण सोडत निघाली. हे आरक्षण भाजप आणि राष्ट्रवादीला काहीसी साेईचे, तर शिवसेना आणि शिंदेसेनेची काेंडी करणारे असल्याचे प्राथमिक चित्र आहे. अध्यक्ष, उपाध्यक्षांचे गट आरक्षित झाल्याने त्यांना शेजारच्या गटात संधी शाेधावी लागणार आहे.

जि.प.अध्यक्षा रंजना पाटील यांचा रावेर तालुक्यातील गट खुला झाल्याने त्यांच्याएवजी त्यांचे पती प्रल्हाद पाटील उमेदवारी करू शकतात. नगरपरिषदेमुळे अडचण झालेले उपाध्यक्ष लालचंद पाटील यांना शेजारील आसाेदा गटात जावे लागेल. यावल तालुक्यातील आराेग्य समितीचे सभापती रवींद्र पाटील, समाजकल्याण समिती सभापती जयपाल बाेदडे यांचेही हक्काचे गट राखीव झाले आहे.

या पदाधिकाऱ्यांची संधी गेली, दिग्गजांना अडचणी
जळगाव तालुक्यात प्रभाकर साेनवणे, पवन साेनवणे यांचे गट राखीव झाल्याने त्यांची संधी गेली. चाेपड्यात भाजपच्या उमेदवार माजी सभापती ज्याेती पाटील, काँग्रेसचे दिलीप पाटील यांना पुन्हा संधी मिळेल. यावलमध्ये किनगाव गट खुला झाल्याने माजी सदस्य आर. जी. पाटील यांना संधी आहे. तर काँग्रेसचे जि.प.तील गटनेते प्रभाकर साेनवणे यांना यावेळी आरक्षितएेवजी खुल्या गटातून लढावे लागेल. रावेरमध्ये माजी उपाध्यक्ष नंदकिशाेर महाजन यांना गट आरक्षित झाल्याने शेजारच्या निंभाेरा गटात उभे रहावे लागेल. भुसावळमध्ये रवींद्र पाटील यांचा गट राखीव झाला, तर पल्लवी सावकारे यांना खुल्या महिला गटातून किंवा तळवेल गटात जावे लागेल

बातम्या आणखी आहेत...