आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:पदवीधर शिक्षक नेमा; अन्यथा पं.स.बाहेर वर्ग

मोठे वाघोदाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मोठा वाघोदा (ता.रावेर) येथील जि.प.उर्दू शाळेत २६० विद्यार्थ्यांचे सात वर्ग आहेत. मात्र, त्यांच्या शिकवण्यासाठी केवळ पाच शिक्षक आहेत. पदवीधर शिक्षकही नाही. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. याप्रकरणी शालेय व्यवस्थापन समितीने रावेर येथे गटशिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. त्याचा उपयोग न झाल्याने गटशिक्षण अधिकारी कार्यालयाबाहेर वर्ग भरवू असा इशारा देण्यात आला.

या जि.प.उर्दू शाळेची स्थापना सन १९२० मध्ये झाली आहे. अनेक गुणवंत विद्यार्थी येथून घडले आहेत. मात्र, शिक्षकांची रिक्त पदे व सोयी सुविधांचा अभाव आहे. गेल्या चार महिन्यांपासून सात वर्गांसाठी पाच शिक्षक असल्याने इतरांवर कामाचा ताण येतो. शाळेत सहावी, सातवीच्या वर्गासाठी एकही पदवीधर शिक्षक नाही. ही स्थिती कायम राहिल्यास भविष्यात पटसंख्या कमी होऊन शाळादेखील बंद पडू शकते.ही समस्या सोडवण्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीने पंचायत समितीला निवेदन दिले होते. तरीही हालचाली नाहीत. दरम्यान, या शाळेवर पूर्वी ८ शिक्षक होते. आताही दोन दिवसात पदवीधर शिक्षकाची नियुक्ती न केल्यास शाळेतील सहावी आणि सातवीचे वर्ग रावेर येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात भरवू असा पवित्रा शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी घेतला आहे. त्यामुळे रावेर पंचायत समिती काय भूमिका घेते? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

बातम्या आणखी आहेत...