आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन‎:निंभाेरा येथील कृषी तंत्र‎ विद्यालयात अभिवादन‎

निंभाेरा‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

निंभाेरा‎ निंभोरा बुद्रूक येथील कृषी तंत्र‎ विद्यालयात जयंतीनिमित्त क्रांती‎ ज्याेती सावित्रीबाई फुले यांच्या‎ प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून‎ अभिवादन करण्यात आले.‎

यावेळी संस्थाध्यक्ष प्रल्हाद बोंडे‎ यांनी स्त्री शिक्षणाचे महत्त्व पटवून‎ दिले. सावित्रीबाई या पहिल्या‎ भारतीय महिला शिक्षिका,‎ मुख्याध्यापिका हाेत्या. त्यांच्यामुळेच‎ देशात महिला या पंतप्रधान, राष्ट्रपती‎ या सारख्या उच्च पदांवर कार्य करत‎ अाहेत.

सर्व शक्ती सेनेचे अध्यक्ष‎ प्रा.संजय मोरे यांनी सावित्रीबाईंच्या‎ कार्यास उजाळा दिला. विशाल‎ पाटील, कांचन भालेराव, रोहित‎ पाटील, नीलेश पाटील व प्रणव‎ पाटील या विद्यार्थ्यांनी मनोगत‎ व्यक्त केले. उपाध्यक्ष डॉ.एस.डी.‎ चौधरी, तंटामुक्तीचे अध्यक्ष डिगंबर‎ चौधरी, शिक्षक संदीप महाजन,‎ जितेंद्र भावसार, धनराज बावस्कर,‎ जितेंद्र कोळंबे व बाळा शिरतुरे‎ उपस्थित हाेते.‎

बातम्या आणखी आहेत...