आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावल:डोंगरकठोरा, विरोदा, अट्रावल येथे बंधाऱ्यांमुळे वाढणार भूजल पातळी

यावल16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील डोंगरकठोरा, विरोदा व अट्रावल शिवारात आमदार शिरिष चौधरी यांच्या पुढाकाराने ग्रेडेड सिमेंट बंधारे मंजूर झाले होते. नुकतेच या तिन्ही बंधाऱ्याचे भूमिपूजन आमदार चौधरी यांच्या हस्ते झाले. आगामी पावसाळ्यात या बंधाऱ्यांत पाणी अडवून भूजल पातळी वाढीस मदत होईल.

महाराष्ट्र शासन मृद व जलसंधारण विभागाकडे पाठपुरावा करत डोंगरकठोरा, विरोदा व अट्रावल येथे ग्रेडेड सिमेंट बंधाऱ्यांना मंजुरी मिळाली होती. या कामासाठी निधी देखील उपलब्ध झाला होता. नुकतेच विरोदा, अट्रावल व डोंगर कठोरा शिवारात या बंधाऱ्याचे कामाचे भूमिपूजन आमदार शिरिष चौधरी यांच्या हस्ते झाले. जि.प.चे माजी गटनेते प्रभाकर सोनवणे, पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले, डोंगर कठोरा सरपंच नवाज तडवी, अट्रावल सरपंच मोहन कोळी, विरोदा माजी सरपंच जितू चौधरी, योगेश पाटील, डॉ.आर.सी.झामरे, आशा आढाळे, प्रितम राणे, भोजराज पाटील, दिगंबर खडसे, राज रत्न आढाळे, अतुल फिरके, आंनद मेघे, अमोल वारके, ज्ञानदेव वारके, धनराज पाटील, संदेश पाटील, हेमंत चौधरी, गोकुळ चौधरी, विजय चौधरी, सुभाष तायडे, धनराज चौधरी, दीपक कोळी, पवन चौधरी, चंद्रकांत ढाके, विकास चौधरी उपस्थिती होते.

बातम्या आणखी आहेत...