आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील एणगाव येथे शिक्षण परिषद संपन्न झाली. अध्यक्षस्थानी एणगाव शाळेच्या मुख्याध्यापिका पल्लवी तायडे होत्या. परिषदेत व्ही स्कूल अॅप वापराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
शिक्षण परिषदेत केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक व उपशिक्षक तसेच विषय तज्ञ उपस्थित होते. प्रथम सत्रात अजय वाघोदे यांनी निपुण भारत अंतर्गत पायाभूत साक्षरता या विषयांतर्गत निपुण चाचणी क्रमांक एक याबाबत चर्चा केली. विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली ते तिसरीपर्यंत सर्व पायाभूत कौशल्य प्राप्त झाले पाहिजेत याबाबत मार्गदर्शन केले. इयत्ता पहिलीसाठी विद्या प्रवेश या उपक्रमाबाबत चर्चा करण्यात आली. त्याचे आठवडाभर नियोजन कसे करावे व शिक्षक मार्गदर्शिका व विद्यार्थी कार्यपद्धत व पुस्तिका याविषयी चर्चा झाली. श्रीधर पालवे यांनी निपुण भारत अंतर्गत गणित विषयांतर्गत विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय यावर विचार मांडले. विद्यार्थ्यांना संख्या वाचनातील अडचणी व गणित पेटीचा प्रभावी वापर व अध्यापनात प्रभावी शैक्षणिक साहित्याचा वापर यावर मार्गदर्शन केले. नंतर इंग्रजी विषय अध्यापनातील अडचणी व विद्यार्थ्यांच्या मनातील भीती कशी घालवावी याविषयी मार्गदर्शन केले.
शिक्षकांकडून करून घेतले प्रात्यक्षिक
व्ही स्कूल ॲप वापराविषयी प्रात्यक्षिक करून घेण्यात आले. अॅपमधील पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास कसा करावा याबाबतही माहिती सांगण्यात आली. तसेच ॲपचा वापर शाळेमध्ये अध्यापनात कसा करावा, विद्यार्थ्यांची दररोजची उपस्थिती ऑनलाइन भरण्याबाबत माहिती दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.