आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:रावेरात बाप्पावर केली गुलाल, फुलांची उधळण;तालुक्यातील एकूण 147 मंडळांकडून श्रींचा विसर्जन साेहळा शांततेत

रावेर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात निघालेल्या विसर्जन मिरवणुकीत बाप्पा चालले गावाला, चैन पडेना आम्हाला, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याऽऽच्या जयघाेषाने परिसर दणाणला हाेता. शहर व तालुक्यात मिळून १४७ मंडळांकडून श्रींचे विसर्जन झाले.शहरात विसर्जन मिरवणुकींना दुपारी एक वाजता सुरुवात झाली. गणेश मंडळांनी ढोल, ताशे, झांज यासह पारंपरिक वाद्यांसह तालबद्ध लेझीमवर ठेका धरला. विसर्जन मिरवणूक पाराचा गणपती, भोईवाडा, गांधी चौक, विखे चौक, मेन रोड, अग्रसेन चौक, चावडी नागझिरी या मार्गाने निघाली.गणपती बाप्पावर नागरिकांकडून गुलाल आणि फुलांची उधळण करण्यात आली. रात्री ११ वाजता नागझिरीतील विहिरीत सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या मानाच्या श्रींचे विसर्जन करण्यात आले.

फैजपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणेंच्या मार्गदर्शनात येथील पोलिस निरीक्षक कैलास नागरे, सपोनि शीतलकुमार नाईक, गणेश धुमाळ, निंभोरा, देविदास इंगवले, सावदा यांच्यासह ११० पोलिस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे १२५ जवान, दंगा नियंत्रण पथक, राज्य राखीव पाेलिस दलाची तुकडी यांच्याद्वारे बंदोबस्त ठेवला होता. सीसीटीव्हीद्वारे उपद्रवी व समाजकंटकांवर नजर ठेवल्याचे पाेनि कैलास नागरे यांनी सांगितले.

६३१ किलाे निर्माल्याचे संकलन
येथील कारागीर व्यायाम शाळेकडून २७५ किलो व श्रीराम फाउंडेशनकडून ३५६ किलो असे एकूण ६३१ किलाे निर्माल्य संकलन करण्यात आले. माजी नगराध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी शीतपेयाची व्यवस्था केली होती.

लेझीम नृत्यांचे आकर्षण
मिरवणुकीत प्रताप व्यायाम शाळा, महात्मा फुले व्यायाम शाळा, रोकडा हनुमान व्यायाम मंडळ यासह ८ गणेश मंडळांसमोर ढोलताशांच्या तालावर लयबद्ध लेझीम खेळण्यात आली. शहरातून २९ सार्वजनिक तर २४ खाजगी गणेश मंडळांनी तर तालुक्यातून ९४ सार्वजनिक गणेश मंडळांनी सहभाग घेतला. भाजप जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रल्हाद महाजन, दिलीप कांबळे, अशोक शिंदे, शेख गयास, शे.युसूफ, अरुण शिंदे , शे.मुतल्लीब, संतोष पाटील, श्रीराम पाटील, डॉ.कुंदन फेगडे, उमेश महाजन यांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...