आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यतिथी साजरी:श्री संत सावता माळी महाराज पुण्यतिथीनिमित्त गुणगाैरव

यावल6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील श्री महर्षी व्यास मंदिराच्या सभागृहात श्री संत सावता माळी महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या निमित्त आयाेजित कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

श्री संत सावता माळी समाज बहुद्देशीय मंडळ, माळी वाडा व्यास नगरी यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे होते. त्यांच्या हस्ते श्री संत सावता माळी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, अभिवादन करण्यात आले. या वेळी गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन गाैरव करण्यात आला. माळी समाज शहराध्यक्ष रमेश महाजन, सुभाष माळी, नारायण माळी, बाळू माळी, किशोर माळी, मंडळ पदाधिकारी, समाजबांधव उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...