आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव जिल्हा पॉवरलिफ्टिंग असोसिएशनने आयोजित जळगाव जिल्हा पॉवरलिफ्टिंग स्पर्धा रविवार पार पडली. त्यात सावदा श्री स्वामीनारायण गुरुकुलचे १२ विद्यार्थी व ५ विद्यार्थीनी अशा १७ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. त्यांनी ६ सुवर्ण, २ रौप्य आणि १३ कांस्य पदकाची कमाई केली.
मुलींच्या ४४ किलो वजनी गटात सुवर्णपदक विजेत्यांमध्ये करिष्मा सोनवणे (९ वी), ४८ किलो गटात रौप्यपदक हर्षाली तायडे (९वी), ५३ किलो गटात सुवर्णपदक गीतल पाटील (९वी), ६४ किलो गटात सुवर्णपदक जानवी भिरूड (९वी), ७२ किलो गटात जयश्री गोस्वामी (८वी), ५५ किलो गटात कांस्य पदक तेजस पाटील (९वी), सर्वज्ञ महाजन (८वी), यदुनाथ जंजाळकर (१०वी), संकेत पाटील (९वी), ६२ किलो गटात कांस्य पदक हर्षराज परदेशी (१०वी), डोलेश चौधरी (१०वी), ६९ किलो गटात कांस्य पदक दिनेश चौधरी (९वी), जयेश लिहेकर (१०वी), ७७ किलो गटामध्ये कांस्य पदक यश चौधरी (१०वी), खिलेश कोल्हे (९वी), ८५ किलो गटात कांस्य पदक रणवीर पाटील (७वी), ९४ किलो गटात कांस्य पदक कोमल जावळे यांनी यश संपादन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.