आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांडपाणी:स्वच्छतेसाठी गटारीचा प्रवाह अडवला, सांडपाणी रस्त्यावर ; जामनेर रोडवर पादचाऱ्यांचे सांडपाण्यातून मार्गक्रमण

भुसावळ21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात पालिकेने आपत्ती व्यवस्थापनाच्या पार्श्वभूमीवर मान्सूनपूर्व तयारी सुरु केली आहे. शहरातील जामनेर रोडवरील मोठ्या गटारींची स्वच्छता केली जात आहे. या कामामुळे नागरिकांची डोकेदूखी वाढली आहे. स्वच्छतेसाठी गटारींतून वाहणाऱ्या पाण्याचा मार्ग बंद केला जात असल्याने, सांडपाणी रस्त्यावर येते. त्यामुळे सांडपाण्यातूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. शहरातील नाल्यांमध्ये अस्वच्छता कायम आहे. पालिकेने प्रमुख मार्गांवरील मोठ्या गटारींची स्वच्छता सुरु केली आहे. मात्र हे कामही नागरिकांसाठी डोकेदूखी ठरत आहे. गटारींची स्वच्छता करताना सांडपाण्याचा अडसर होऊ नये, म्हणून गटारींमध्ये पाणी अडवले जाते. मात्र हे सांडपाणी ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावर येते. यामुळे जामनेररोडवरील अनेक दुकानदारांच्या दुकानांसमोर गटारींचे पाणी साचल्याने दुकानात जाणेही कठीण बनले आहे. सांडपाण्यातून मार्गक्रमण करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. नियोजन नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

बातम्या आणखी आहेत...