आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नदीला चांगला पूर:हरिपुरा धरणातून पाणी सोडल्याने हडकाईला पूर

यावलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हरिपुरा धरणातून पाणी सोडल्यामुळे शहरातून वाहणाऱ्या हडकाई नदीला चांगला पूर आला आहे. या पाण्यामुळे भूजल पातळी वाढील मदत होईल. विहिर व कूपनलिकांची पातळी वाढून बागायती क्षेत्र वाढू शकते. पाऊस नसताना खळाळून वाहणारे नदीपात्र लक्षवेधी ठरत आहे.यंदा तालुक्यात व सातपुड्यात चांगला पाऊस झाला आहे. या पावसात सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले धरण व पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

यात हरीपुरा धरणात चांगल्या प्रमाणात पाणी साठले आहे.या धरणातून गुरूवारी हडकाई नदीत पाणी सोडण्यात आले. त्यामुळे हाडकाई नदीचे पात्र हरिपुरापासून ते थेट यावल शहरापर्यंत वाहते झाले. नदीपात्रात पाणी सोडल्यामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होऊन शेतातील विहिरींना चांगला फायदा होईल, असा स्थानिक शेतकऱ्यांचा दावा आहे.

बातम्या आणखी आहेत...