आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजय श्री दादाजी फाउंडेशन, नरेंद्र मोदी विचार मंच व जय हनुमान आयटीआय भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त महिलांसाठी रोजगार, स्वयंरोजगारासाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. औरंगाबाद येथून हस्तकला विभागाने महिलांना मार्गदर्शन केले. या शिबिरात ८०० महिलांनी लाभ घेतला. यावेळी नरेंद्र मोदी विचार मंचच्या राष्ट्रीय सचिव योगिता मालवी, दादाजी फाउंडेशनचे सचिव उमेश भावसार, जय हनुमान आयटीआय भुसावळचे संचालक रंजन फालक, जय श्री दादाजी फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष जयश्री इंगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या मेळाव्यात हस्तकला विभाागचे सहाय्यक संचालक मेने व जैन यांनी महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध होण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध योजनांवर मार्गदर्शन करण्यात आले. हस्तकला या विषयावर जास्त माहिती दिली. यात एससी, एसटी प्रवर्गातील महिलेना आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारचे विषेश प्रयत्न व त्यांना सवलतीची माहिती दिली. सदर कार्यक्रमात जय श्री दादाजी फाउंडेशनचे मुख्य समन्वयक शेखर जोशी, अमळनेर तालुकाध्यक्ष अतुल पाटील, चंद्रशेखर पाटील, संगिता भामरे उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.