आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला:तीन लाखांसाठी विवाहितेचा छळ, ७ जणांवर गुन्हा ; नगरदेवळा येथील माहेरवाशिणीची फिर्याद

पाचोरा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माहेरून तीन लाख रुपये आणावे या मागणीसाठी नगरदेवळा येथील माहेरवाशिणीचा, उपलखेडा (ता. सोयगाव) येथील सासरच्या मंडळींनी शारिरीक व मानसिक छळ केला. याप्रकरणी विवाहितेने पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा नोंदवला.

नगरदेवळा येथील असना परविन हिचा विवाह उपलखेडा येथील असीफ अली लियाकत अली याच्याशी झाला होता. लग्नानंतर सासरच्या मंडळींनी माहेरहुन ३ लाख रुपये आणावे या मागणीसाठी असना परविन यांचा शारिरीक व मानसिक छळ सुरू केला. सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर विवाहितेने पाचोरा पोलिस स्टेशन गाठत असिफ अली लियाकत अली (पती), लियाकत अली भिकन अली (सासरे), सलमाबी लियाकत अली (सासू), शराफत अली लियाकत अली (दिर), साजेराबी शेख जावेद (नणंद), जावेद शेख मुस्ताक (रा. रतनजीनगर, जंगलशहा बाबा दर्गा, गल्ली नं. १, घर क्रं. ११, सुरत), शाहीस्ताबी अलीन शेख (रा. शिंदाड, ता.पाचोरा) या सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल विनोद पाटील करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...