आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:हर्ष चौधरीला स्केटिंग‎ स्पर्धेमध्ये दोन पदके‎

यावल‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील फैजपूर शहरातील‎ रहिवासी हर्ष भोजराज चौधरी या‎ खेळाडूने, राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत‎ दोन पदक पटकावले. ही स्पर्धा‎ खोपोली मुंबई येथे घेण्यात आली‎ होती.‎ या स्पर्धेत देशातून ६०० स्केटींग‎ खेळाडू सहभागी झाले होते. या‎ स्पर्धेत हर्षने एक ब्रांझ व एक कांस्य‎ पदक मिळवले. तो एन. के. नारखेडे‎ इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ या‎ शाळेतील विद्यार्थी आहे.

या‎ शाळेच्या माध्यमातून त्याची निवड‎ खोपोली मुंबई येथे घेण्यात आलेल्या‎ राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी झाली‎ होती. आठ वर्षाखालील गटात दोन‎ मिनिटांच्या स्पर्धेत ब्रांझ मेडल‎ मिळवले. तर वीस सेकंदाच्या‎ स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे. या‎ खेळाडूला स्केटिंग अकॅडमीचे‎ प्रशिक्षक दीपेश सोनार, पियुष‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ दाभाडे, अमोल ओगले यांचे‎ मार्गदर्शन लाभले. यशाबद्दल त्याचे‎ फैजपूर शहरात कौतुक होत आहे.‎ आगामी काळातील विविध‎ स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यासाठी त्याने‎ नियोजन केले आहे. त्यासाठी‎ नियमित सरावही सुरू केला आहे.‎ त्याला शाळेतील शिक्षकांचे‎ मार्गदर्शन लाभते.‎

बातम्या आणखी आहेत...