आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामध्य प्रदेश व विदर्भातील परतीच्या पावसामुळे हतनूर धरणातील पाण्याची आवक नोव्हेंबर महिन्यातही सुरु आहे.सध्या धरणात ४६ क्युमेक्स पाण्याची आवक होत आहे. यामुळे धरण १०० टक्के भरल्यानंतरही दोन दरवाजे २५ सेंटीमीटरने उघडून नदीत विसर्ग सुरू आहे. विशेष म्हणजे डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत धरणात पाण्याची आवक काम राहील, असा अंदाज आहे.
भुसावळ शहरासह अर्ध्या जिल्ह्याला हतनूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. तब्बल ३७ हजार हेक्टर जमीन हतनूरच्या उजव्या तट कालव्यामुळे ओलिताखाली येते. यामुळे भुसावळ विभागासाठी हतनूर जलसंजीवनी ठरते. यंदा हतनूर धरण १० ऑक्टोबरपर्यंत वेळेत १०० टक्के भरले.
यानंतरही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात परतीच्या पावसाने हजेरी लावली होती. मध्य प्रदेशात ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे हतनूरमध्ये पाण्याची आवक अजूनही कायम आहे. सध्या धरणात प्रती सेकंद ४६ क्युमेक्स आवक सुरू आहे.
दोन दरवाजे २५ सेंटीमीटरने उघडले आहेत.२० नोव्हेंबरनंतर आवर्तन रब्बी हंगामासाठी हतनूर धरणातून यंदा फेब्रुवारीपर्यंत दर महिन्याला कालव्यातून आवर्तन मिळेल. पहिले आवर्तन १५ नोव्हेंबरला देण्याचा निर्णय झाला होता. मात्र, यावल व चोपडा तालुक्यात काही ठिकाणी पाटचाऱ्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. पहिले आवर्तन २० नोव्हेंबरनंतर दिले जाईल, अशी माहिती शाखा अभियंता एस.जी.चौधरी यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.