आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाभ:रब्बीसाठी हतनूर धरणातून मिळणार चार आवर्तने, चार तालुक्यांना लाभ

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हतनूर धरणाच्या उजव्या तट कालव्यातून यंदाच्या रब्बी हंगामासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान प्रत्येक महिन्याला दुसऱ्या पंधरवड्यात आवर्तन दिले जाणार आहे. मंगळवारी (दि.१) हतनूर धरणावर झालेल्या प्रकल्प सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार रावेर, यावल व चोपडा तालुक्यातील ३७ हजार हेक्टर जमिनीसाठी १५ नोव्हेंबरपासून पहिले आवर्तन सोडण्यात येईल.

यंदाच्या परतीचा पाऊस उशिरापर्यंत राहिला. मात्र रब्बीसाठी पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे मंगळवारी धरणावर प्रकल्पस्तरीय कालवा समितीची बैठक झाली. जलसंपदा, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता डी.बी.बेहेरे, सावद्याचे उपविभागीय अभियंता आर.एस.पांडव, यावलचे व्ही.बी.नेमाडे, चोपड्याचे पी.बी.पाटील, हतनूरचे शाखा अभियंता एस.जी.चौधरी उपस्थित होते.

या बैठकीत रावेर, यावल, चोपडा तालुक्यातील कालवा सल्लागार समितीच्या सदस्यांनी हतनूर धरणातून दरमहा १५ ते ३० तारखेदरम्यान आवर्तनाची मागणी केली. जलसंपदा विभागाने ही मागणी मान्य केली. त्यानुसार नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान १५ ते ३०, तर फेब्रुवारीत १५ ते २८ तारखेदरम्यान आवर्तन मिळेल. यामुळे रब्बीसाठी पुढील चार महिने दरमहा १५ दिवस आवर्तन मिळेल. १५पासून पहिले आवर्तन सुटेल.

बैठकीला यांची होती उपस्थिती
प्रकल्पस्तरीय पाणीवापर संस्थेच्या अध्यक्षा कांचन फालक यावल, कालवास्तरीय पाणीवापर संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील, संचालक अतुल ठाकरे, गिरधर पाटील, अरुण पाटील, रवींद्र करांडे, नीलेश पाटील, चंद्रकांत पाटील, लक्ष्मण मराठे, विलास पाटील, युवराज पाटील, बळवंत ठाकरे, दिनकर भंगाळे, मधुकर महाजन आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...