आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहतनूर धरणाच्या पाणलोटक्षेत्रातील पूर्णा व तापी नदीच्या खोऱ्यात गेल्या २४ तासांमध्ये तब्बल ३९२.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. यामुळे शुक्रवारी (दि. १७) हतनूरचे चार दरवाजे अर्धा मिटरने उघडून ११२ क्युमेक्स प्रतिसेकंद वेगाने विसर्ग करण्यात आला. तापी खोऱ्यात केवळ टेक्सा व देडतलाई या दोनच केंद्रांवर पावसाची नोंद झाली.
गेल्या २४ तासांत अर्थात गुरुवारी सकाळी आठ ते शुक्रवारी सकाळी आठ दरम्यान हतनूरच्या पाणलोटक्षेत्रात ३९३.२ मिमी पाऊस झाला. यामुळे पूर्णा नदीची ऐरडी येथील जलपातळी वाढली आहे. धरणात आवक वाढणार असल्याने शुक्रवारी दुपारी १२ वाजता हतनूर धरणाचे चार दरवाजे अर्धा मिटरने उघडून विसर्ग करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.