आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील रोटरी क्लब ऑफ भुसावळ, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे रविवारी आयोजन झाले. सकाळी १० ते सायंकाळी ५ या काळात चक्रधरनगरातील रोटरी भवनात आयोजित शिबिरात, १६० ज्येष्ठ नागरिकांची नेत्र, हृदयराेग, स्त्रीरोग, अस्थिराेग तपासणी करण्यात आली. आरोग्य शिबिराचे उद्घाटन डॉ.वैभव पाटील, डॉ.एन.एस.आर्वीकर व रोटरी अध्यक्ष ऋषी शुक्ला यांच्याहस्ते करण्यात आले. डॉ. वैभव पाटील, डॉ.समाधान भायेकर, डॉ.सी.डी.सारंग, डॉ.तेजस कोटेचा, डॉ.एन.एस.आर्वीकर, डॉ.अंजली मयेकर, डॉ.राहुल जनबंधू, डॉ.अंकित भालेराव, डॉ.माया आर्वीकर, डॉ.निलिजा यांनी ज्येष्ठांनी आरोग्य तपासणी केली. लॅब टेक्निशीयन, नर्सिंग स्टाफ व इतर सहकाऱ्यांनी योगदान दिले.
तपासणीनंतर ज्येष्ठांना पुढील उपचाराबद्दल माहिती देण्यात आली. आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ भुसावळचे अध्यक्ष ऋषी शुक्ला, सचिव प्रकाश ठाकूर, कोषाध्यक्ष अनंत पाटील, जी.आर.ठाकूर, हेमंत नाईक, अॅड.बोधराज चौधरी, राजेश अग्रवाल, महेश भराडे, विकास कात्यायनी, संजय चापोरकर, प्रदीप दवे, सारंग चौधरी, राधेश्याम लाहोटी, राजश्री कात्यायनी, डॉ.रवींद्र शुक्ला, राजेंद्र ठाकूर, मदन बोरकर, नरेंद्र अहिरे, गोपाल तिवारी, डॉ नीलेश भिरुड, सतीश झांबरे, रघुनाथ सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
तेलकट पदार्थ टाळा उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन करताना डाॅक्टरांनी सांगितले की,उतार वयात आपण आरोग्याची काळजी घ्यावी.अस्वस्थ वाटल्यास डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा,दरराेज हलका व्यायाम करावा,तेलकट पदार्थांचे सेवन टाळावे, प्रसन्न राहावे,जुन्या मित्रांसाेबत गप्पागोष्टी कराव्या, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.