आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभुसावळ तालुका आणि वरणगाव शहर काँग्रेस कमिटीने गोदावरी फाउंडेशनतर्फे अफजल क्लिनिकमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. त्यात ४०० रुग्णांची तपासणी झाली. पैकी ५० गरजूंवर डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मोफत उपचार होणार आहेत. या शिबिरामध्ये टू डी इको, ईसीजी, कार्डिओग्राफ, मधुमेह, रक्तदाब, नेत्र तपासणी करण्यात आली.
यापैकी ज्या नेत्ररोग, अस्थिरोग व हृदयरोग रुग्णांना शास्त्रक्रियाची गरज असेल त्यांना पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले. गोदावरी फाउंडेशनच्या सदस्या डॉ. केतकी पाटील, डॉ.यशश्री देशमुख, डॉ.अंजली मयेकर, डॉ.चारू सोनवणे, डॉ.अमेय लोखंडे, डॉ.पियुष पवार, डॉ.दिनेश चौधरी यांनी तपासणी केली. शिबिराच्या यशस्वितेसाठी वरणगाव शहराध्यक्ष अश्फाक काझी, भुसावळचे माजी तालुकाध्यक्ष पंकज पाटील, मनोज देशमुख, ज्ञानेश्वर पाटील, अखिल शहा, शैलेश बोधले, तालुकाध्यक्ष गजानन देशमुख, कल्पना तायडे, प्रकाश भिसे, राजेश काकांनी, सुभाष हळदे व अफजल क्लिनिकचे डॉ.मुबशीर खान हबीब, मोहंमद रफी, फैजान अहमद खान, मुदस्सर खान यांच्यासह कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.