आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायकल दिन:उच्च रक्तदाब, मधुमेह झाल्याने दररोज औषधे घ्यावी लागायची, वर्षभर नियमित सायकल चालवल्याने आता औषधे घेण्याची आवश्यकता नाही

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या बिकट काळाने आरोग्याप्रती जागृतता निर्माण केली. याच काळात अडगळीत पडलेली सायकल बाहेर निघाली. आता सुदृढ आरोग्यासाठी सायकलिंग ही मोठी चळवळ बनली आहे. सायकलने अवघ्या काही दिवसात रिझल्ट मिळाल्याने अनेकांनी उच्च रक्तदाब, मधुमेह, फुप्फुसांचे विकार, हात- पाय दुखणे, वाढलेले वजन, पोटाचे विकार आदींवर मात करता आली. मधुमेह व उच्च रक्तदाबाची औषधीही सायकलींगमुळे डॉक्टरांनीच तपासणी करुन बंद केल्याचेही उदाहरणे भुसावळात आहेत.

पोलिस विभागात नोकरीस असल्याने ताणतणाव, अनुवांशिकतेमुळे चाळीशीतच मधुमेह, उच्च रक्तदाब जडला. दररोज औषधे घ्यावी लागत होती. सायकलिंग हा सर्वात चांगला व्यायाम असल्याने सायकलिंग सुरु केली. नंतर भुसावळातील सायकलिंग ग्रुपमध्ये जुडलो. सायकलिंग सुरु केल्यानंतर एक वर्षानंतर जीवनात जणू चमत्कारच घडला. रक्तदाब व मधुमेहासाठीची औषधे घेण्याची आता गरज नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पूर्वी वजन ७८ होते, पोटाचा घेर वाढला होता. शहर वाहतूक शाखेत सेवा असल्याने दिवसभर पॉइंटवर उभे राहून सायंकाळी पाय दुखत, मात्र सायलींगनंतर पोटाचा घेर कमी झाला. पूर्वीच्या पॅण्ट आता दीड दोन इंचांनी सैल व्हायला लागल्या. ११ किलोने वजन कमी होऊन आता ६७ वर पोचले. पाय दुखी बंद झाली. गेल्या वर्षी नाशिक येथील ३०० किमीमध्ये सहभाग घेतला. घाटात सायकलवरून पडल्याने हात फॅक्चर झाला, अशा स्थितीमध्येही स्पर्धा पूर्ण केली.

कोरोनापूर्वी गुडघेदुखीचा प्रचंड त्रास होता. अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतला. औषधोपचार घेतल्यावर तात्पुरता आराम मिळत होता, मात्र पुन्हा काही दिवसानंतर दुखणे सुरु व्हायचे. डॉक्टरांनी मला वजन कमी करण्याचा सल्ला दिला. कोरोनाचे नियम काही अंशी शिथील झाले, तेव्हापासून सायकलिंग व रनिंग सुरु केली. त्यात प्रामुख्याने सायकलींगमुळे खूप फायदा झाला. ८५ किलो वजन होते ते सहा महिन्यांत २२ किलो कमी होऊन ६३ वर आले. यामुळे गुडघेदुखीचा त्रास कायम स्वरुपी बंद झाला. आजच्या स्थितीत कोणत्याही प्रकारची व्याधी नाही. सायकलिंग असा परिपूर्ण व्यायाम आहे, की यामुळे पायाच्या नसापासून डोक्यापर्यंत च्या सर्व नसांचा व्यायाम होतो. विशेष म्हणजे शारिरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्यही सुधारते. महिलांनी आपल्या आरोग्याच्या काळजीसाठी सायकलींगसाठी वेळ नक्कीच द्यायला हवा.

भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन या ग्रुपमध्ये रनिंग करीत होतो. तीन वर्षांपूर्वी रनिंग करताना बामणोद जवळ पडल्याने पाय फॅक्चर झाला. डॉ. तुषार पाटील यांच्याकडे पायाचे ऑपरेशन करुन रॉड टाकावा लागला. यानंतर रनिंग करण्यासाठी अडचणी येवू लागल्या, स्नायू आखडले गेले. यापुढे रनिंग होईल किंवा नाही? याची शाश्वती नव्हती. डॉ. पाटील यांनी स्नायू मोकळे होण्यासाठी सायकलिंग करण्याचा सल्ला दिला तेव्हापासून सायकलिंग सुरु केले. सुरुवातीला दोन, तीन किलोमीटर व नंतर अंतर वाढवत नेले. सायकलींगमुळे नसा, सांधे मोकळे झाल्याने दोन महिन्यांतच रॉड टाकलेला पाय पूर्वीपेक्षाही अधिक सक्षमतेने काम करु लागला. यानंतर पुन्हा रनिंगही सुरु झाली. आता पूर्वीपेक्षा अधिक जलद गतीने रनिंग करतो. सायकलींगमुळे रोगप्रतिकारक शक्ती प्रचंड वाढली. यामुळे गेल्या दोन वर्षांपासून मी कधी आजारी पडलो, असे आठवत नाही.

सायकलिंग लो इम्पॅक्ट वर्कआऊटचा प्रकार ^सायकलींग हा एक लो इम्पॅक्ट वर्कआऊटचा प्रकार आहे. नियमीत सायकलिंग केल्याने वजन नियंत्रणात राहते. फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. मधुमेह आणि ह‌दयविकाराचा धोका कमी होतो. हाडे आणि सांधे मजबूत होऊन ते पूर्वीपेक्षा अधिक क्रियाशील होतात. सायकलिंग केल्याने शारिरिक स्वास्थासोबत इंधनाची बचत होऊन पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागून प्रदूषण कमी करण्यास मदत होते. डॉ. मकरंद चांदवडकर, रोटरी सायक्लोथॉनचे प्रणेते, भुसावळ.

बातम्या आणखी आहेत...