आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्राथमिक शिक्षण हे उच्च शिक्षणाचा पाया आहे. तर उच्च शिक्षण हाच देशाचा विकासाचा पाया आहे. म्हणून उच्च शिक्षणाचा अभ्यासक्रम पुनर्रचना करताना रोजगार संधी, संशोधनाला महत्त्व, शिक्षणाचा समतोल याचा विचार करणे क्रमप्राप्त आहे, असे प्रतिपादन माजी प्र.कुलगुरू डॉ. पी. पी. माहुलीकर यांनी केले.
येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने, प्रथम वर्ष विज्ञान वर्ग रसायनशास्त्र विषयाची विद्यापीठस्तरीय अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा नुकतीच उत्साहात झाली, त्यावेळी उद्घाटन करताना डॉ.माहुलीकर बोलत होते. अध्यक्षस्थानी रसायनशास्त्र अभ्यास मंडळाचे चेअरमन प्राचार्य डॉ. एस. एस राजपूत (दादासाहेब रावळ महाविद्यालय, दोंडाईचा) होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. आर. पी. फालक, अभ्यास मंडळ सदस्य प्र. प्राचार्य डॉ. एच. ए.महाजन, प्रो. ए. एम. नेमाडे, डॉ. जी. एच. सोनवणे, डॉ.नीलेश पवार, उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील उपस्थित होते. तसेच जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील एकूण ८० प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी केले. अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा आयोजन करण्या मागील भूमिका त्यांनी विषद केली. प्राचार्य डॉ.आर. पी. फालक यांनी सक्षम विद्यार्थी व स्पर्धेत टिकणारा विद्यार्थी आधारित अभ्यासक्रम असायला हवा असे मार्गदर्शन केले. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.एस. पी. कापडे यांनी केले व आभार सदर कार्यशाळेचे समन्वयक प्रा. एम. डी. खैरनार यांनी मानले. डॉ. ए. एन. सोनार (रावेर) व प्रा. के. एम. बोरसे (धुळे) यांनी मत मांडले. समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. एस. पी. कापडे यांनी केले तर आभार रसायन शास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर. डी. पवार यांनी मानले. उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील, उपप्राचार्य संजय पाटील, डॉ. सुधा खराटे यांनी परिश्रम घेतले.
अभ्यासक्रम पुनर्रचनेची गरज
अध्यक्षीय भाषणात डॉ. एस. एस. राजपूत यांनी शिक्षणाची गुणवत्ता व भविष्यकाळात शिक्षणाची आवश्यकता यावर अभ्यासक्रम पुनर्रचना करण्याची गरज का आहे, यावर मार्गदर्शन केले. विविध विषयांची मांडणी करत त्यांनी उदाहरणे देत मार्गदर्शन केले.
दोन सत्रात झाली कार्यशाळा
अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा दोन सत्रात झाली. प्रथम वर्ष विज्ञान रसायनशास्त्र विषयाला अंतिम स्वरूप देण्यात आले. यात अभ्यासक्रम पुनर्रचनेबाबत सविस्तर चर्चा होऊन डॉ. एस. जी शेलार (भडगाव), डॉ. आर. के. चौधरी (दोंडाईचा), डॉ. एस. एन. वैष्णव (ऐनपूर) यांनी विचार मांडले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.